गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार यांनी राजुरा येथील भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयात आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी त्यांचे गळात पक्षाचा दुपट्टा टाकून भाजपात स्वागत केले.
राजुरा विधानसभेचा निकाल हा ऐतिहासिक असाच ठरला. देवराव भोंगळे हे तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी भाकीत मांडणाऱ्या राजकीय पंडीतांचे सर्व दावे चुकीचे ठरवत भाजपचे देवराव भोंगळे हे चार माजी आमदारांना शह देत निवडून आले. थेट जनसंपर्क, गोरगरीबांच्या सेवेला धावून जाण्याची आत्मियता आणि प्रभावी प्रचारयंत्रणा हे भोंगळेंच्या विजयासाठी जमेची बाजु ठरले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केले.
निवडणुकीच्या प्रचारपुर्व काळापासूनच देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तरूणांची भाजपला पसंती दिसून येत होती. श्री. भोंगळे आमदार झाल्यानंतर राजुरा विधानसभेत पक्षप्रवेशाचा वेग वाढला असून आमदार भोंगळे यांच्या नेतृत्वात विधानसभेत दररोज शेकडो प्रवेश होत आहेत. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता भाजपात जोरदार इनकमिंग होत असल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे.
पुर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते असलेले संगमवार हे मध्यंतरीच्या काळात कॉंग्रेसमध्ये गेले होते. परंतू देवराव भोंगळे निवडून येताच पुन्हा पलटी होत 'विकासाचा वादा, देवराव दादा' म्हणत ते पुन्हा भाजपवासी झाले.
यावेळी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे, तालुका महामंत्री निलेश पुलगमकर, जेष्ठ नेते दिपक बोनगिरवार, बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, भाजयुमोचे महामंत्री व बाजार समितीचे उपसभापती स्वप्नील अनमूलवार, साईनाथ मास्टे, सुहास माडूरवार, सुरेश धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.