Tiger Attack: तेंदूपत्ता संकलन ठरले काळ! वाघाच्या हल्ल्यात महिला ठार!

चंद्रपूर:- नागभीड तालुक्यात जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला वाघाने लक्ष्य करत जागीच ठार केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.


नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा येथील रहिवासी असलेली इंदिराबाई शंकर ऊईके (वय ६० वर्ष) असे या मृत महिलेचे नाव आहे. सध्या जंगलात तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असल्याने, इंदिराबाई नेहमीप्रमाणे आज सकाळी जंगलाच्या दिशेने गेल्या होत्या. मात्र, जंगलात वाघाने त्यांच्यावर अचानक आणि अत्यंत भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की इंदिराबाईंचा जागीच मृत्यू झाला. हि घटना सकाळच्या सुमारास घडली.