पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने भाजपा पोंभुर्णा तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन.

Bhairav Diwase
40 रक्तदात्यांनी केले रक्तदान.
Bhairav Diwase.   May 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- देशात कोरोना वायरसने थैमान घेतल्यामुळे प्रशासनाने प्रादुर्भाव प्रतिबंध उपाय म्हणून अनेक योजना राबवित आहे. त्याचप्रमाणे पोंभुर्णा तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त माजी अर्थमंत्री, वन, नियोजन, तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आव्हानानुसार पोंभुर्णा भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडी तालुका पोंभुर्णाच्या वतीने चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा येथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिरामध्ये एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचे योगदान दिले. पोंभुर्णा तालुक्यातील भाजपा पार्टीने आज पर्यन्त अनेक उपक्रम राबवत आहे. उपक्रमाद्वारे मास्क व सनिटायझर वाटप, जीवनावश्यक वस्तूंची मदत, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबवित आहेत. दि. ३१ मे रोज रविवारला चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला. 

न्युज व्हिडिओ पहा:-  https://youtu.be/74JHkjdeHW8

या रक्तदान शिबीराला माजी जि.प. अध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांनी भेट दिली व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले. व त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सर्व रक्तदात्यांचे भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, महिला आघाडी तर्फे मनःपूर्वक आभार व अभिनंदन.
     या रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी भाजपा ता. अध्यक्ष गजानन गोरंटीवार, प. स.सभापती अल्काताई आत्राम, जि.प. सदस्य राहुल संतोषवार, उपसभापती प.स  ज्योतीताई बुरांडे, नगरसेवक अजित मंगळगिरीवार, माजी उपसभापती विनोद देशमुख, युवा मोर्चा ता.अध्यक्ष अजय मस्के, युवा मोर्चा ता महामंत्री आदित्य तुम्मुलवार, नगरसेवक मोहन चलाख, नगराध्यक्षा श्वेताताई वनकर, उपनगराध्यक्षा राजियाताई कुरेशी, गजानन मुडपुवार, नगरसेविका शारदाताई कोडापे, सुनिल सावकार कटकमवार, नगरसेविका  सुनीताताई मॅकलवार, प.स सदस्य गंगाधर मडावी, नैलेश चिंचोलकर, रोशन ठेंगणे, श्रीकांत वडस्कर, महेंद्र सोनुले, विनोद कानमपल्लीवार, संजोग शीरभय्ये, राजु ठाकरे, राहुल वासेकर, अजित जम्बूलवार यांनी अथक परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.