पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्याने भाजपा सावली तर्फे रक्तदान शिबीर आयोजित.

Bhairav Diwase
३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
       Bhairav Diwase.   May 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- देशात कोरोना वायरसने थैमान घेतल्यामुळे प्रशासनाने प्रादुर्भाव प्रतिबंध उपाय म्हणून अनेक योजना राबवित आहे त्याचप्रमाणे सावली तालुक्यातील भाजपा पार्टीतर्फे पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन कृषि उत्पन्न बाजार समिती येथे घेण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर तर्फे आयोजित तालुकास्तरावरील भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन चिमूर-गडचिरोली लोकसभेचे खासदार मा.श्री अशोकजी नेते यांचा शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
सावली येथील भाजपा पार्टीने आज पर्यन्त अनेक उपक्रम राबवून सेवा देणाऱ्यापासून ते सामान्य माणसांना सेवा देत आहे. उपक्रमाद्वारे मास्क व सनिटायझर वाटप, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबवित आहेत. त्याचप्रमाणे सावली येथील कृषी उत्पन्न समिति बाजार येथे दि. ३१ मे रोज रविवारला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले
कोवीड- १९ प्रतीबंध करण्यासाठी जागतीक स्थरापासुन त खेड्यातील व्यक्तींला यापासून सुरक्षीत करण्यासाठी केद्र व राज्य सरकार सर्वस्थरावरुन प्रयत्न करीत आहे. कोरोना संसर्ग प्रतीबंधा करीता राज्यातील आरोग्य, महसुल पोलीस, विभागाबरोबर अनेक कर्मचारी जिवाची पर्वा न करता एक विश्वयुद्ध योद्धया प्रमाणे लढत आहेत.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या आव्हानानुसार राज्यात भविष्यात उद्भवना-या आपातकालीन परिस्थीतीत ब्लड बँंकेत आवश्यक रक्त पुरवठा लक्षात घेता दि. ३१ मे रोजी सावली येथील कृषि उत्पन्न बाजार समिती येथे भारतीय जनता पार्टीतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

न्युज व्हिडिओ पहा:-  https://youtu.be/pSU96McBdEo

आजच्या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र, तालुका अध्यक्ष भाजपा अविनाश पाल, भाजपा तालुका सचिव व महामंत्री सतीश बोम्मावार, जि प माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, डॉ तुषार मर्लावार, देवराव मुदमवार जि प सदस्य मनिषाताई चिमुरकर, पंचायत समिती माजी सभापती छायाताई शेंडे, जि प सदस्य योगिताताई डबले, प्रकाश गड्डमवार, नगराध्यक्ष चंद्रकांत संतोषवार, ग्रा पंचायत सदस्य अनिल माचेवार, राकेश कोंबतुलवार, सावली तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी तथा रक्तदान शिबिर चमु टिम मा.डॉ.किशोर ताराम रक्त सं.अधिकारी गडचिरोली, कु.निशाली भरने प्र.शा.तं, व्यंकटेश दिकोंडा प्र.शा.तं, सूरज चांदेकर अधिपरि चारिका, मुरलीधर पेद्दीवार मदतनीस, जिवन गेडाम मदतनीस, यादवराव हरडे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.