व्याहाड (बु.) येथे जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप.

Bhairav Diwase
गरजू आणि निराधारांना अन्नधान्याच्या कीटचे वाटप.
Bhairav Diwase.   May 09, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात घोषित करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरिबांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना दोन वेळच्या अन्नासाठी मोठा प्रश्न भेडसावत आहे.
अशा परिस्थितीत जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी गरजू आणि निराधारांना जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याची मदत व्हावी हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज सावली तालुक्यातील व्याहाड (बु.) येथे भेट देऊन तेथील गरजू आणि निराधारांना अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले.
यावेळी त्यांसमवेत बंडू नर्मलवार तसेच आदि मंडळी उपस्थित होते.