सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांना आव्हान करण्याचे डॉक्टरांना निर्देश.
Bhairav Diwase. May 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सावली तालुक्यातील व्याहाड (बु) प्रा. आ. केंद्राला कोरोणा विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रा. आ. केंद्रातील उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी स्थानिक आरोग्यासंबंधी अनेक विषयांवर चर्चा करत स्थितीचा आढावा घेतला.
दिवसेंदिवस देशात कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्याची स्थिती विदारक होत चालली आहे. त्यामुळे याचा अधिक फटका जिल्ह्याला बसू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपयोजना आखल्या जात आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आणि सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान स्थानिकांना करा. असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सर्वांना दिले.
याप्रसंगी बंडू नर्मलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी, प्रा. आ. केंद्राचे आरोग्य सेवक, कर्मचारी यांसह आदी मंडळी उपस्थित होते.