श्री राम सेना तर्फे चंद्रपुर शहर महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना मास्क वाटुन, व नास्ता देऊन कर्मचाऱ्यांचे कौतुक.

Bhairav Diwase
श्री राम सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.
Bhairav Diwase.     May 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर 
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू आला आहे. आणि. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. त्यामुळे श्री राम सेना चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष रंजितभाऊ , राष्ट्रीय उपाध्यक्ष आकाश भाऊ सफेलकर यांच्या आदेशानुसार श्री राम सेना तर्फे चंद्रपुर शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना  मास्क वाटप करण्यात आले. व नास्ता देऊन कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. 

                 त्यावेळेस कामगार अध्यक्ष कल्पेश रणदिवे, वाहतूक प्रमुख निलेश गुजर, युवा अध्यक्ष वैभव एनपल्लीवार, वाहतूक अध्यक्ष सचिन हरणे, जिल्हा महामंञी आशिष बोंडे, व्यापारी उपाध्यक्ष दिनेश सोनुले, समाज सेवक जग्गु भाऊ, कामगार उपाध्यक्ष नितेश मेहता, अजय यादव, रूपेश रणदिवे, मनिष काले तसेच श्री राम सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.