पोंभूर्णा आणि गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे.

Bhairav Diwase
केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी तहसीलदार पोंभुर्णा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन.
Bhairav Diwase.  May 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोवीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आणि जिल्ह्यातील लॉकडाऊन तथा संचारबंदी घोषित केली आहे. सदर लॉकडाऊन  कालावधीत मागील एक महिन्यापासून पोंभूर्णा व गोंडपिपरी या दोन्ही तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र बंद असल्यामुळे, शेतकऱ्यांकडे कापूस शेतमालाचा ४० ते ५० टक्के साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्याचा कापूस १,५०० रुपये पासून ४,००० पर्यंत खरेदी केल्या जात असून सीसीआय खरेदी ही ५,४०० असून शेतकऱ्यांना जवळपास १२०० ते १४०० रूपाने नुकसान आहे.

 म्हणून जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्यावर खूप आर्थिक संकट कोसळले. शेतकऱ्याचा डोळ्यासमोर येणार हंगाम आणि शेतकऱ्यावर असलेले बँकांचे कर्ज कसे भरायचे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा असे प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असते. शासनाने या कडे लक्ष दिले पाहिजे. जेने करून शेतकरी आर्थिक संकटात सापडणार नाही. शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तथा कापूस खरेदी बंद अभावी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. 
     कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी कार्यक्षेत्रातील मे. वृंदावन जिनिंग अंड प्रेसिंग इंडस्ट्रीज, नवेगाव वाघाडे यांचे सोबत कापूस पणन महासंघामार्फत खरेदी संबंधित करार झाला आहे. त्याशिवाय बाजार समितीकडे नोंदणी केली असून गोंडपिपरी केंद्रावर कापूस खरेदी करीत आठवड्यातून प्रतवारीकाराची (ग्रेडर) नियुक्ती केली.
     आठवड्यातून दोन दिवस म्हणजे फक्त 60 गाड्यांची खरेदी होणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील कापूस खरेदी करण्यासाठी किमान ५ महिने लागतील. याकरिता शेतकऱ्यांची नोंदणी लक्षात घेता पूर्वकालीन प्रतवारीकार (ग्रेडर) आणि केंद्रप्रमुख यांची नियुक्ती करून कामाची वेळ वाढवून जास्तीत जास्त कापूस गाड्यांची मोजमापन करण्यात यावी. 
     
असे पत्र जनसामान्यांच्या हितासाठी, जनसामान्य व्यक्तीसाठी कार्य करणारे केमारा-देवाडा जिल्हा परिषदेचे लाडके सदस्य श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी तहसीलदार पोंभुर्णा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना श्री.वासुदेव पाल, श्री. अनिल श्रीकोंडावार, श्री. राजू ठाकरे उपस्थित होते.


सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच जनतेमध्ये संधम व भिती निर्माण होईल अशाप्रकारे संदेश किंवा माहिती खात्री झाल्याशिवाय सोशल मिडीयावर प्रसारीत करु नका:- श्री. राहुलभाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर