कार्तिक मारोती कोवे असे मृत मुलाचे नाव.
Bhairav Diwase. June 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील भटारी येथे तलाव आहे. त्या तलावात लहान मुल रोज पोहायला जात असते. पण आज काळान घात घातला. सायंकाळी भटारी येथील तलावात लहान मुल पोहायला गेले. मारोती कोवे यांचा मोठा मुलगा कार्तिक मारोती कोवे वय १२ हासुद्धा त्या मुलान सोबत पोहायला गेला असता. तो खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाला. हि घटना सायंकाळी 04:00 च्या सुमारास घडली. हि बातमी गावात कळताच गावातील नागरिक तलावा कडे धाव घेतले. परंतु खुप वेळ झाल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला. हि बातमी ऐकून घरच्यांना धक्का बसला. त्यांच्या वर आणि गावात शोककळा पसरली आहे. हि बातमी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन कळवण्यात आली.

