Chandrapur News: बोंडे कुटुंबाला 'सेवा सहकारी संस्थे'चा त्रास!

Bhairav Diwase

कोर्टातील पराभवानंतर कुटुंबासमोर जीवन-मरणाचा प्रश्न?
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील एका निराधार आणि गरीब कुटुंबावर सेवा सहकारी संस्थेच्या कथित त्रासामुळे आत्महत्येची परवानगी मागण्याची वेळ आली आहे. सुमारे ४० वर्षांपासून सरकारी 'आबादी' जागेवर वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबाला खोट्या कागदपत्रांच्या आधारे पतसंस्थेने कायदेशीर लढाईत हरवून बेघर करण्याची तयारी केली आहे. Chandrapur News 


पाटाळा येथील‌ शिलाताई या दोन्ही पायांनी अपंग आहेत आणि याच जागेवर त्यांचे कुटुंब सन १९८६ पासून राहत आहे. हे घर शिलाताईंच्या नावावर आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, पतसंस्थेने त्यांच्या जागेवर ताबा मिळवण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे कोणतेही राजकीय पाठबळ नसल्याचा फायदा घेत, सेवा सहकारी पतसंस्थेने न्यायालयात खोटे दस्ताऐवज सादर केले आणि त्यांना कोर्ट मॅटरमध्ये हरवले. Chandrapur 


कोर्टातील पराभवानंतर हवालदिल झालेल्या बोंडे कुटुंबाने आता शासनाकडे 'स्वेच्छामरणाची' परवानगी मागितली आहे, अन्यथा त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. मनसेने या प्रकरणाची दखल घेतली असून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या गंभीर प्रकरणात जिल्हा प्रशासन आणि शासनाने तत्काळ लक्ष घालून अपंग आणि निराधार बोंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेणे गरजेचे आहे. Court