चंद्रपूर:- राज्य शासनाने पोलीस भरतीची घोषणा करताच राज्यभरातील तरुणाईमध्ये नवचैतन्य संचारले आहे. आपला 'खाकी' गणवेशाचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातील युवक-युवती सध्या कसून तयारी करत आहेत. या भरतीत तरी आपला नंबर लागेल या आशेवर ते पहाटेपासून मैदानात घाम गाळत आहेत.
जिल्हा स्टेडियम आणि रस्त्यांवर सामूहिक सराव:
चंद्रपूर जिल्ह्यातील हे ध्येयवेडे युवक-युवती आपल्या स्वप्नातील गणवेशासाठी सज्ज झाले आहेत. नोकरीची नवी उमेद उराशी बाळगून त्यांनी सकाळी लवकर जिल्हा स्टेडियम, रामबाग आणि रस्त्यावर सामूहिक धावण्याचा सराव सुरू केला आहे. शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्याचा निर्धार करत हे तरुण आपल्या घामातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहात आहेत.
पोलीस व अन्य भरती बातम्या 2
आत्मविश्वास आणि पालकांचा पाठिंबा:
परीक्षेच्या दडपणातही या तरुणांच्या चेहऱ्यावर आशा आणि आत्मविश्वासाचा झळाळता प्रकाश दिसत आहे. 'सराव म्हणजेच यशाची पहिली पायरी' असे मानून अनेक युवक-युवती सध्या आपल्या तयारीला वेग देत आहेत. विशेष म्हणजे, पालक आणि ग्रामस्थही या नव्या ध्येयवेड्या पिढीकडे अभिमानाने पाहात आहेत. त्यांची मेहनत आणि जिद्द पाहून या तरुणांना उत्कृष्ट यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.