Top News

नायब तहसीलदारांवर रेती माफियांचा हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल.

कार्यालयीन पथकास मारहाण करणे, प्रशासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे याबाबत शहर पोलीस स्थानकात तिघांविरोधात गुन्हा दाखल.
Bhairav Diwase.    July 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपू:- चंद्रपुर जिल्ह्यातील येथील इरई नदीच्या पात्राबाहेर अवैधरीत्या रेती उत्खनन करून वाहनात भरत असताना पथकाने मारलेल्या धाडीच्या वेळी नायब तहसीलदारावर रेती माफियांनी हल्ला करून मारहाण, धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ माजली आहे. जमलजट्टी जवळील इरई नदीच्या पात्रात रेती उत्खनन होत असल्याची माहिती नायब तहसीलदार राजू धांडे यांच्या पथकाला मिळाली. पथक ताबडतोब घटनास्थळी गेले असता नदी पात्रालगत ४ हाफ बॉडी ट्रक व १ ट्रॅक्टर रेती उपसा करून गाडीत भरत असताना आढळून आले. तेव्हा तेथून त्यातील रेती तस्करांनी नायब तहसीलदार राजू धांडे यांच्यावर हल्ला केला. शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्यातील एक हाफ बॉडी ट्रक वाहन पळून गेले.

याप्रकरणी कार्यालयीन पथकास मारहाण करणे, प्रशासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे याबाबत शहर पोलीस स्थानकात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने