Top News

खासगी सुरक्षा रक्षकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या.

रक्षित मेश्राम वय(45) असे मृत व्यक्तीचं नाव असून तो खासगी सुरक्षा रक्षक होता.
Bhairav Diwase.    July 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपुर:- चंद्रपुर जिल्ह्यात आत्महत्याचे सत्र सुरू असून चंद्रपूर शहरात काल नागपूर रोडवरील वड़गाव परिसरातील आंबेडकर सभागृह जवळ रत्याच्या कड़ेला असलेल्या लिंबाच्या झाड़ाला गळफांस घेऊन, एकाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काल सकाळी या परिसरात मॉर्निंग वॉक करताना नागरिकाना एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेले अवस्थेत आढळला. नागरिकांनी नगरसेवक पप्पू देशमुख यांना याबाबत माहिती दिली होती. रक्षित मेश्राम वय(45) असे मृत व्यक्तीचं नाव असून तो खासगी सुरक्षा रक्षक होता. या परिसररत मागील वर्षभरापासून राहत असून कौटुंबिक वादातुन आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

रामनगर पोलीस पंचनामा करुन चौकशी करत आहेत. टाळेबंदीत अनेकांचा रोजगार बुडाला आहे. आत्महत्या करणारा व्यक्तीही बाहेरगावाहून रोजगाराच्या शोधत आला होता, अशी माहिती आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने