Bhairav Diwase. Aug 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- पदवीधर शिक्षक अरुण कालिदास लाटकर मु.निमगाव ता.सावली यांचे आज ठीक 7:45 वाजता दुःखद निधन झाले आहे. आज सकाळी उठल्यावर छातीमध्ये दुखू लागले त्यांना लगेच गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू ची बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली. जिल्हा परिषद शाळा सामदा येथे शिक्षक असलेले लाटकर अतिशय मन मिळावू व विधार्थी चे चाहते होते.त्यांचा मृत्यू हा अनेकांना चटका लावणारा आहे. त्यांच्यावर आज दुपारी निमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचा मागे पत्नी व मुलगा सह मोठा लाटकर परिवार व आप्तेष्ट आहे. त्यांना आधार न्यूज नेटवर्क च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..