Bhairav Diwase. Aug 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- इडा पीडा जाओ आणि बळीचे राज्य येवो ही उक्ती घेऊन नामदार बच्चू भाऊ व प्रहार जणशक्ती पक्ष नेहमीच बळीराजाच्या पाठीशी उभा आहे..
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध समस्या घेऊन आज पोळा या शेतकरी सणाच्या दिवशी नवनियुक्त जिल्हाधिकारी गुल्हाणे साहेब यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांचा पाढा वाचला.मावळते जिल्हाधिकारी यांच्या काळात विविध समस्या मार्गी लागण्याच्या मार्गावर असताना बदली झाल्याने
नवीन जिल्हाधिकारी यांची भेट घेतली..
यात प्रामुख्याने चंदई नाला प्रकल्प,जामनी गाव यांचे बाकी असलेला मोहबदला, वेकोली व रेल्वे संदर्भात अन्यायग्रस्त शेतकरी यांचे प्रश्न आणि जिल्ह्यातील वनपट्टे धारक शेतकरी यांच्या प्रलंबित समस्या बाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.यात जिल्हाधिकारी साहेब यांनी सर्व समस्या समजून घेतल्या व विविध विभागातील संबंधित अधिकारी यांचेशी बैठक घेऊन प्रश्न निकाली काढणार असे त्यांनी सांगितले तर जिल्ह्यातील सर्वात वनपट्टे धारक शेतकरी यांच्या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन या संदर्भात बैठक घेऊन जिल्ह्यातील जेवढे पीडित शेतकरी गाव आहेत त्या प्रत्येक गावात कॅम्प लावून सर्व माहिती भरून सर्व शेतकऱ्यांच्या समक्ष वनपट्टे धारक शेतकऱ्यांची सोडविण्यासाठी आपण स्वतः प्रामाणिक प्रयत्न करू असे जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितले...
यावेळी प्रहार सेवक शेरखान पठाण,बालाजी खिरटकर, अतुल निब्रड,वसंता मेश्राम,तुलसी रामटेके ,वनहक्क समिती अध्यक्ष बाम्हनगावन चे वामन बावणे ,वनहक्क समिती सचिव किटाडी चे देविदास सहारे, चंदई नाला प्रकल्पाचे सुनील घोडमारे आदी शेतकरी उपस्थित होते.