Click Here...👇👇👇

बिबी गावकऱ्यांचा आदर्शगाव दौरा शेतकरी संघटनेला खूपतोय उपसरपंच आशिष देरकर यांचा हल्लाबोल.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- मागील फेब्रुवारी महिन्यात ग्रामपंचायत बिबीने आदर्शगाव पाटोदा, हिवरेबाजार, शिर्डी, शनिशिंगणापूर इत्यादी ठिकाणी बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु.), गेडामगुडा येथील १२१ लोकांना ग्राम दर्शन घडविले मात्र गावातील काही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आदर्शगाव दौरा खुपत आहे.
सविस्तर वृत्त असे की, लोकसहभाग व स्मार्ट व्हिलेज निधीमधून आदर्श गाव दौऱ्यादरम्यान छत्री ट्रॅव्हल्स यांच्याकडून ग्रामपंचायतने 3 ट्रॅव्हल्स दौऱ्यावर नेल्या होत्या आणि रीतसर ट्रॅव्हल्स कंपनीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बिल देण्यात आले होते. मात्र ट्रॅव्हल्स कंपनीकडून बिलावर टाकलेले गाडी नंबर चुकीचे आहे असा विरोधकांचा आरोप सत्य आहे. ही ट्रॅव्हल्स कंपनीकडून झालेली चूक आहे. मात्र त्यांनी ती चूक दुरुस्त करून सुधारित बिल दिले.
या प्रकरणात ग्रामपंचायतीचा किंवा पदाधिकाऱ्यांचा काहीही दोष नाही. ज्या ट्रॅव्हल कंपनीला ग्रामपंचायतने ऑर्डर दिला त्यांनी सदर बिल दिलेले आहे. त्यांनी दिलेले बिल फाईलमध्ये लावण्यात आले. ग्रामपंचायतने दिलेली रक्कम आणि बिलावर लिहिलेली रक्कम तपासली असता बरोबर आहे. गाडी नंबर वगैरे तपासण्याच्या भानगडीत ग्रामपंचायत पडली नाही. मात्र हि चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्याबरोबर त्यांनी बिल बदलून दिले. वास्तविक कोणतीही ग्रामपंचायत मोठ्या गाड्यांची रक्कम दिल्यानंतर लहान गाडीचे बिल लावणार नाही. गावातील १२१ लोकांना ग्रामपंचायतीने सहलीला नेले होते. आणि आदर्श गावांची पाहणी केली होती. ही बाब गावातील काही लोकांना पचनी पडत नसल्याने खटाटोप सुरु आहे.
तक्रारदारांमधील काही लोकांनी स्मार्ट ग्रामविषयी आक्षेप घेतले होते. मोठ्या प्रयत्नानंतर गावाला हे पारितोषिक मिळाले. त्यासाठी गावातील विशेषतः महिलांनी मोठे कष्ट केले. पुढे तेच लोक आता स्मार्ट ग्रामच्या बक्षीस रकमेवर डोळा ठेऊन आहे. स्मार्ट ग्राम निधीतून इथे हे काम करा, तिथे ते काम करा म्हणून ओरड करीत आहे.
                                                                                                                     
 
ग्रामपंचायत बिबीला दिलेले बिल घाईघाईत चुकीने प्रिंट झाले असून बिलात दुरुस्ती करण्यात आली आहे.  एका ठिकाणी MH 34 BR 0024 च्या ठिकाणी MH 34 BF 0024 झाले आहे. हे वाहन छत्री ट्रॅव्हल्सच्या नावाने आहे. या योगायोगाचा संबंध उपसरपंच नोकरी करीत असलेल्या शाळेतील एका वाहनाची जोडण्याचा प्रयत्न तक्रारकर्त्यांकडून करण्यात येत आहे. बिलात बदल करून देण्यात आले आहे. 
-संदीप छत्री
संचालक, ट्रॅव्हल्स एजेंसी