मिनी आयटीआय मध्ये अमीत अलोणे यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसांनी संचालक मोहन भिसेला चौकशीसाठी बोलाविले, पण ते स्टेशनला जाण्यास टाळाटाळ.
गोंडपिपरी:- गोंडपिपरीच्या मिनीआयटीआय चालकाने अल्पवयीन तरूणीचा विनयभंग केला. या प्रकारानंतर समाजात प्रचंड रोष व्यक्त झाला. याप्रकरणात पोलीसांनी संचालक मोहन भिसेला चौकशीसाठी बोलाविले पण ते टाळाटाळ करित आहेत. दरम्यान विनयभंगाच्या प्रकरणानंतर आता सोसायटीचे अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. प्रवेश घ्या, घरी बसा, अन उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा. हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून सूरू आहे. यामाध्यमातून सोसायटी नियमबाह्यरित्या मोठा मलिंदा लाटत आहे. यामुळ या प्रकाराची सविस्तर चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी आता समोर येत आहे.
गोंडपिपरी येथील मिनी आयटीआय मध्ये अमीत अलोणे याने करंजी येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणानंतर आता गोंडपिपरी पोलीसांनी बल्लारपूरच्या आयटीआयच्या संचालकाला चौकशीसाठी बोलाविले. पण संचालक चौकशीला खो देत आहे.दरम्यान या प्रकारानंतर काही तरूणींनी बोगस कामाची तक्रार केल्याची माहिती आहे. या साऱ्या प्रकारानंतर बल्लारपूरातील संचालक मोहन भिसेलआ संशयाच्या भोवऱ्यात अटकले आहे.
बल्लारपूर येथील श्रध्दा मल्टीपर्पज सोसायटी बल्लारपूर चे मोहन भिसे हे संचालक आहेत. या सोसायटीच्या वतीने गोंडपिपरी येथे अमीत अलोणे नामक तरूण मिनी आयटीआयचे कामकाज सांभाळत होता.
काही दिवसापुर्वी अमीत अलोणे याने डिप्लोमा घेण्यासाठी आलेल्या करंजी येथील एका अल्पवयीन तरूणीचा विनयभंग केला होता. याप्रकरणाची तक्रार पिडीतेच्या कुटुंबियांनी केली. यानंतर अलोणेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तो 14 दिवसाची न्यायालयीन कोठळी भोगत आहे. अलोणे याने पोलीसात दिलेल्या बयानात बल्लारपूर येथील श्रध्दा मल्टीपर्पज सोसायटीसाठी आपण काम करित असल्याचे सांगितले होते.
दरम्यान याप्रकरणी गोंडपिपरी पोलीसांनी बल्लारपूर येथील सोसायटी संचालक मोहन भिसे यांना चौकशीसाठी बोलाविले. पण ते अद्यापही पोलीसांसमोर दाखल झाले नसल्याची माहिती आहे.
दरम्यान तरूणीच्या विनयभंग प्रकरणानंतर सोसायटीच्या विरोधात काही तरूणींनी तक्रार दिल्याची माहिती आहे. पण एका मध्यस्त्याच्या माध्यमातून या तक्रारी सेट करण्यात आल्याची चर्चा आहे.
मिनीआयटीआय मध्ये प्रशिक्षणाचे वर्ग भरत नव्हते. शेकडो विद्यार्थ्यांचा प्रवेश असतांना केवळ आठ बाय आय च्या खोलीतून हा कारभार सूरू होता. प्रवेश घ्या, घरी बसा, अन पास व्हा. सोबतच शिष्यवृत्तीसोबत प्रमाणपत्र मिळवा. यातून हजारो रूपयाचा मलिंदा लाटल्या जात होता.