(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- आज दिनांक 22/09/2020 रोजी महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आरोग्य निरोगी रहावे व कोरोना आजारातून भाऊ लवकर बरे होऊन स्वस्थ व दीर्घायू व्हावे याकरिता चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री देवरावजी भोंगळे व भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री.ब्रिजभूषणजी पाझारे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला की गावात आपापल्या परिसरातील हनुमान मंदिर मध्ये जाऊन हनुमान चालीसा पठाण करून आ. सुधीर भाऊंना कोरोना आजारातून बरे व्हावे याकरिता सर्वांनी पूजा-अर्चना केली व बल्लारपूर मध्ये रुद्र चंडी यज्ञ करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये हनुमान चालीसा पठण हा कार्यक्रम राबवण्यात आला.
याप्रसंगी भाजयुमो जिल्हा महामंत्री आशिष देवतळे, भाजयुमो जिल्हा महामंत्री महेश देवकते, आशिष ताजने, राकेश पून, प्रशांत येल्लेवार, मनीष वासमवार, इम्रान खान, महेश श्रीरंग, प्रवीण मोहुर्ले, रामलालजी डोनाडकर, सुयोग बाळबुधे, सचिन डोहे, सचिन शेंडे, रोहन काकडे, अजय मस्के, मोहन चलाख, भैरव दिवसे, किशोर मुंगले, सुरज धात्रक, मोहन कलेगुरवार, महेश कोलावार तसेच समस्त जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शविली व भाऊंच्या स्वस्त जीवनाकरिता प्रार्थना केली.