भजनाद्वारे गोंडपिपरी परिसर संगीताने आनंदमय.
जिल्हा महासचिव भारतीय जनता युवा मोर्चा राकेश पून यांच्या नेतृत्वात.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष लोकनेते, जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे जिल्ह्यामध्ये कोविंड या रोगापासून कसे दूर राहता येईल करिता ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. असे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनाच कोरोना ची लागण झाली आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून जिल्हा महासचिव भारतीय जनता युवा मोर्चा राकेश पून यांच्या नेतृत्वात तालुक्यातील मंदिरामध्ये महाआरती तथा हनुमान चालीसा पठण करून, माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी कोरोना तून लवकर बरे होऊन जनकल्याणासाठी लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी आम्हाला प्रेरित करण्याकरिता बरे व्हावे. याकरिता गोंडपिपरी भाजपा युवा मोर्चा तर्फे माता वार्ड येथील हनुमान मंदिरात सकाळी 8:30 वाजता हनुमान चालिसा, भजन, महाआरती करून हनुमान जि यांचेकडे लवकर बरे व्हावे करीता साकडे घालण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष बबन जी निकोडे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव राकेश पुन, संजय झाडे, नगर पंचायत सभापती चेतन सिंह गौर, ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष सुनील फुकट, पंचायत समिती सदस्य मनीष वासमवार, गणेश डहाळे, ओबीसी महामंत्री प्रशांत येल्लेवार, गणपती चौधरी, गणेश मेरुगवार तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.