पत्रकारांचा पुतळा जळणारा मुख्य सूत्रधार आहे तरी कोण? याबद्दल संभ्रम,
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्गुस येथे काही राजकीय भुरट्या नेत्यांच्या अंगात सत्तेचे वारे शिरले असून एनकेन प्रकारे प्रकाशझोतात राहण्यासाठी ते काहीतरी उपद्व्याप करीत असतात, दस-याच्या दिवशी तर महिला शक्तीच्या नावाने काही महिलांना एकत्रित करून चक्क त्यांनी पत्रकारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे, जो पत्रकारिता क्षेत्रावर एक प्रकारे हल्ला आहे,मात्र तो खरा सूत्रधार कोण? याबद्दल संभ्रम कायम आहे.
एकीकडे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रावन दहन करण्यात आले नाही. घरातच दसरा साजरा करा असे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आले होते.
परंतु राजकीय वरदहस्त असलेल्या काही महिला शक्तीच्या नावाखाली महिला गोळा होऊन त्यांनी पत्रकारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. कोणतीही पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता व प्रशासनाची परवानगी न घेता केले. जे गुन्ह्यास पात्र आहे त्यामुळे त्या तथाकथित महिलांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रेखा कैथल, राहुल चौधरी, सदनबाबु रेनकुंटला व संजय पडवेकर यांनी घूग्गूस पोलिस स्टेशन येथे दिलेल्या निवेदनात केली आहे.