बल्लारपूर शहरात क्षुल्लक कारणातून युवकाची हत्या.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 19, 2020
बल्लारपूर:- शहरातील पेपरमील परिसरातील स्लज गार्डन जवळ क्षुल्लक कारणावरून 2 युवकांनी एकाच्या चेहऱ्यावर लाकडी राफ्टर ने वार केल्यामुळे युवकाचा जागीच मृत्यू झाला. बल्लारपूर शहरातील पेपरमील परिसरातील स्लज गार्डन म्हणजे युवकांच्या व्यसनाच घर बनले आहे.


काल सायंकाळी 6 वाजेदरम्यान महाराणा प्रताप वार्डातील 25 वर्षीय सुनील सिमलवार यांच्यासोबत काही युवकांचा वाद झाला, या वादाच रूपांतर हाणामारीत झाल्याने त्या युवकांनी सुनीलच्या चेहऱ्यावर लाकडी राफ्टर ने वार केला, हा वार इतक्या जोरात होता की सुनील जागीच ठार झाला.

माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठविला. पोलिसांनी संशयाच्या आधारे एका युवकाला अटक केली असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.


बल्लारपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी मुळे पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहे