छावा क्षात्रवीर सेना तर्फे विविध मान्यवरांचे सत्कार.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- सामाजिक कामात अग्रेसर असणारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान सुरवसे य व प्रदेश कार्यकारणी यांच्या आदेशावरून प्रदेश प्रवक्ते सचिन उभे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती बैठक मेळावा पार पडला यावेळी. महीला प्रदेशाध्यक्ष सौ संगीता ताई डाहुले, अनिल पारखी विदर्भ अध्यक्ष ,सौ सरिता मालू महिला विदर्भ अध्यक्ष सौ विशाखा राजूरकर चंद्रपूर महिला संपर्क प्रमुख, सौ.सुनीताताई गायकवाड महिला प्रदेश उपाध्यक्ष, पंकज खेडकर जिल्हा अध्यक्ष भंडारा, आकाश मिसाळ संपर्क प्रमुख नागपुर, संदीप भंगे शहर अध्यक्ष नागपूर भागताई नाराळे महिला जिल्हाअध्यक्ष चंद्रपुर व्यंकटेश गडड्म ITI लेक्चरर राजुरा, रंजना नागतोडे, महिला उपाध्यक्ष चंद्रपूर, जासमीन शेख चंद्रपूर महिला शहर प्रमुख, राज गईनवर जिल्हा प्रमुख चंद्रपूर, वंदना गईनवर, महिला शहर प्रमुख भद्रावती, पंकज मत्ते आदर्श शिक्षक म्हणुन सत्कार करण्यात आला. यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.

यावेळी शिवश्री सचिन सुधाकर बोबडे जिल्हा कामगार अध्यक्ष सचिन ज्ञानेश्वर बोबडे तालुका अध्यक्ष राजुरा, निखिल रवींद्र हिंगाने तालुका उपाध्यक्ष राजुरा,अमोल सुरेश गारघाटे तालुका सचिव राजुरा,विकास हिंगाने तालुका शहर प्रमुख राजुरा, मनोज बोढेकर, ग्रामीण अध्यक्ष चिंचोली, समाधान ढुमणे तालुका कोषाध्यक्ष राजुरा, गोपाल अकनूरवर तालुका सदस्य प्रमोद पेटकर, तालुका अध्यक्ष कोरपणा नियुक्ती करण्यात आली . प्रदेश प्रवक्ते सचिन उभे यांनी यावेळी बोलताना सांगितले आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आपल्या संघटना तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे जिथे अन्याय होत असेल तिथे न्यायासाठी लढा जिथे आपल्या माता-भगिनी व त्यांनी होत असेल तिथे आवाज उठवा अशाप्रकारे संघटनेने आजपर्यंत एक वर्ष मध्ये संघटना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरी पोचली . त्यामुळे आपल्या संघटनेचे ब्रीद वाक्य गाव तिथे शाखा शाखा तिथे समाजसेवा पद्धतीने योजना राबवायची आहे. संघटनेची या विषयावर चर्चा करण्यात आली . विदर्भ अध्यक्ष अनिल पारखी महिला प्रदेशाध्यक्ष विभागीय संगीताताई डावले‌. विशाखा राजगुरूकर आदींनी विचार मांडले.