धानोली येथील ग्रामस्थांकडून गोदरु पाटील जुमनाके यांना श्रद्धांजली.
कोरपना:- तालुक्यातील धानोली येथील ग्रामस्थांकडून गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गोदरु पाटील जुमनाके यांचा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. गोदरु पाटील जुमनाके हे एक राजकीय नेता म्हणून नाही तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात त्यांनी काम केल.
त्यामुळे राजकीय पटलावरचा सामाजिक कार्यकर्ता हरपला आहे, त्यांची पोकळी कुणीही भरून काढणार नाही अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. या वेळी धानोली येथील सरपंच विजय रणदिवे, ज्योतीराव मंगाम, सकर्म मेश्राम, चंद्रभान किन्नाके (शिक्षक), बंडू मडावी, सोमा मंगाम, प्रकाश किन्नाके व धानोली येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किन्नाके सर यांनी तर सूत्रसंचालन रामकिसन मडावी यांनी केले.