ब्रम्हपुरी:- भारतरत्न, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंती निमित्त २५ डिसेंबर पासून ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे ब्रम्हपुरी युवा क्रिकेट क्लब चिचखेडा व अतुलभाऊ देशकर युवा मंच द्वारा आयोजित ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या "माजी आमदार चषक २०२१" क्रिकेट स्पर्धेला सुरवात होते आहे.
मागील २ वर्षांपासून चिचखेडा येथे माजी आमदार चषक क्रिकेट सपर्धेचे आयोजन करण्यात येते. माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांचे हे मूळ गाव असून त्यांच्या मातोश्री स्व. शांताताई देशकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ पारितोषिक देण्यात येत.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला २१,००० रु रोख व चषक, उपविजेत्या संघाला १५,००० रु रोख व चषक तर तृतीय क्रमांक वर असलेल्या संघाला ९,००० रु रोख व चषक मिळणार आहे. या स्पर्धेत एकूण ६१,००० रूपयांचे बक्षिसे देण्यात येणार असून, स्पर्धेचे प्रवेश शुल्क ८०० रु ठेवण्यात आले आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातच न्हवे तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ही बहू चर्चित व लोकप्रिय स्पर्धा आहे. चंद्रपूर - राजुरा पासून ते गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने विशेष नियम ठरविण्यात आले आहेत. खेळायला येणाऱ्या प्रत्येक खेळाडूची स्क्रिनिंग सहित ऑक्सिजन लेव्हल ची तपासणी करण्यात येणार आहे. सोबतच गावातील प्रेक्षकांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था असून बाहेर गावाहून येणाऱ्या खेळाडूंसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. सॅनिटीझरचा वापर सुद्धा वेळोवेळी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
२५ डिसेंबरला स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष स्थानी ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सहउद्घाटक भाजपा जिल्हा संघटन महामंत्री तथा जि. प सदस्य संजय गजपुरे असून भाजपा जिल्हा महामंत्री क्रिष्णा सहारे, ओबीसी आघाडी प्रदेश कार्यकरिणी सदस्य प्रा.प्रकाश बगमारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.गोकुल बालपांडे, जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर, जेष्ठ नेते प्राचार्य अरुण शेंडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सोबतच तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील या भव्य स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा पं.स सभापती प्रा.रामलाल दोनाडकर,भाजपाचे युवा नेते प्रा.यशवंत आंबोरकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव तथा स्पर्धेचे आयोजक तनय देशकर, कृष्णा तुपट, वरुण पंडे यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नंदू हनवते 7264059236, पवन जांबुळे , 9834582178, 7798719459 यांना संपर्क करायचा आहे.