विरुर स्टेशन येथील गुलाब गोहणे या शेतकऱ्याने संपविले स्वतःचे जीवन.

आत्महत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- विरुर स्टेशन येथील गुलाब नथ्थु गोहणे वय 35 वर्ष याने आपल्याच शेतातील झाडाला गळफास लाउन आत्महत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असुन आज सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली.
      सदर घटना अशाप्रकारे आहे राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील गुलाब गोहणे हा शौचालयाला जातो म्हणुन रात्री 10 वाजताच्या सुमारास घरुन निघाला. थोड्या वेळाने येईन म्हणुन घरचे मंडळी झोपी गेले. मात्र सकाळ होउनही गुलाब घरी परत न आल्याने घरच्यानी शोधाशोध केली. 
         
      शेतातील झाडाला गळफास लाउन असल्याचे शेताजवळील एका शेतकऱ्याने सांगितले. तेव्हा याची माहीती विरुर पोलिसांना देण्यात आली. विरुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार कृष्ण कुमार तिवारी , सदानंद वडस्कर व त्याचे सहकारी घटनास्थळी जाउन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठविण्यात आले .
       
        गुलाब गोहणे यांना दोन एकर शेतजमीन आहे. कर्ज काढुन दुसऱ्या शेतकल्याची ठेक्याने शेती करीत होता. मागील तीन वर्षापासुन सततची होणारी नापिकी यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. त्याच्या मागे आई, वडिल, भाउ, पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नसुन पुढील तपास ठाणेदार कृष्ण कुमार तिवारी यांचे मार्गदर्शनात सदानंद वडस्कर हे करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने