खुलेआम रेती माफिया कडून रेती तस्करी?
चिमूर:- चिमूर तालुक्यातुन उमानदी उगम पावत असून अनेक नदी, नाले हे नैसर्गिक साधन संपत्तीने समृध्द असलेल्या या तालुक्यात गौण खनिजाची विपुलता लाभली असली तरी जिल्ह्यात कोठेही रेतीचे घाटाचे अजूनही लिलाव झालेले नाहीत मात्र महसुल विभागाच्या दुर्लक्ष भुमिकेमुळे चिमूर तहसिलला दोन तहसीलदार असूनही तालुक्यातील गौण खनिज असलेल्या बोळधा नदी पात्रातून पोकल्यांड, ट्रॅकटर, हायवा ट्रक द्वारे रेती तस्कराकडून पोखरल्या जात असून शेकडो ब्रास रेती नदीचे बाहेर काढून नेत असतानाच महसूल विभाग मृग गिळून गप्प का? चिमूर तालुक्यात गेल्या दोन वर्षात रेतीमाफिया वाढले असून यात काही महसूल अधिकारी यांचे स्वतःचे ट्रॅक्स असल्याचे तालुक्यात आणि महसूल विभातात बोलले जात असून महसूल विभागाने आंधळ्याचे सोंग कश्यासाठी की लाखो रुपयांचा मलिदा खाऊन चलने दो असे तर होत नाही ना अशी चर्चा दिसून येत आहे.
सध्यातरी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात रेती घाटाचे लिलाव झालेले नाही असे असतानाही चिमूर तालुक्यात व शहरात दिवसरात्र ट्रॅकटर द्वारे रेतीचे उतखान सुरू असून खाजगी, सरकारी कामावर या चोरट्या रेतीचा वापर होत आहे .आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात या अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्या गाड्या आप आपल्या घरी परत जातात. यामुळे महसुल विभागात कोणीतरी "घरका भेदी" असावा? ज्यामुळे कुंपनच शेत खात असल्याचा प्रत्यय प्रकर्षाने दिसुन येत आहे.
तालुक्यात सोनेगाव गावडे, बोळधा, मेटेपार, शेंडेगाव, तळोधी, केसलापूर, उसेगाव, गोदेदा, वडसी, खांबडा, मोटेगाव, मासळ, पालसगाव, पीपर्दा, केसलापूर, काग, टेकेपार, पिपळगाव, कोटगाव, इत्यादी गांवामधिल नदी, नाले काठावर विनापरवाना घाट निर्माण करून रात्री व दिवसाला मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्याजेसीबी, पोकल्यांडने ट्रॅक्टरच्या माध्यमातुन रेतीचा उपसा केल्या जात आहे. एका घाटावर ट्रॅक्टर आपल्या पाळीची वाट बघतानाचे दृष्य पाहायला मीळत असल्याचे गांवकरी सांगतात. एवढेच नव्हे तर जेसिबी मशिनच्या माध्यमातुन 'हायवा 'ट्रक भरून तालुक्याबाहेरही रेती पोहचत असल्याची माहीती मिळत आहे. तेंव्हा कुठल्याही प्रकारची अधिकृतपणे परवाना नसतांना बाहेर जिल्ह्यात व इतर ठिकाणी एवढी रेती वाहतूक होते कशी?
बोळधा- शिवनपायली दरम्यानच्या नदीच्या पत्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीचे अवैधरित्या उतखनंन होत असून येथे रात्रभर मोठ्या मोठ्या मशीन द्वारे ट्रॅकटर व हायवा द्वारे रेतीमाफिया रेती उपसा करून नेत असतांना यात शासनाचा लाखों रुपये महसूल बुडविला जात आहे असे प्रकार या तालुक्यात तीन चार ठिकाणी होऊनही महसूल विभागाने बघ्यांची भूमिका का घेतली आहे असे नागरिकांत बोलले जात आहे. नदी पात्रातून पुन्हा लांब पर्यत रेती काढता यावी यासाठी नदीत बेशर्माची झाडे तोडून व गिट्टी टाकून रस्ताही तयार करण्यात येत आहे तर अनेक ठिकाणी नदी पत्रात रेती नेलेले मोठमोठे खडेडे पात्र दिसत आहे पण हे सर्व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कसे दिसत नाही? असे जनतेत बोलले जात आहे.