Top News

पेंढरी मक्ता येथील दोन सुपुत्र देशाच्या बॉर्डरवर.....

Bhairav Diwase. Jan 23, 2021

सावली:- पेंढरी मक्ता येतील प्रणय नथू निकोडे, बि एस. एफ मध्ये तर भास्कर नेताजी गावले हा सी. आर. पी. एफ मध्ये दाखल झाले अतिशय सामान्य घरामध्ये जन्म घेऊन देशाची सेवा करण्यासाठी तळमळ असलेल्या आणि नियमित अभ्यास करून देशसेवेत जाण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. अशातच सामान्य घरात कु. प्रणय नथू निकोडे व भास्कर नेताजी गावडे या दोघांचाही जन्म सामान्य परिस्थितीत झाला. 

     परिस्थिती तशीही थोडी गरीबच पण स्वतःला काहीतरी सिद्ध करायचं हे मनाशी बाळगलेआणि तश्या दिशेनं दोघे हि चालू लागले मिळेल तो काम करायचे आणि रोज मिळेल त्या वेळामध्ये आपला सराव व अभ्यास करायचे . सर्वांशी मिळून राहायचे शेवटी मेहनत करून भरती झाले, पण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना या रोगाने सर्वांच्या मेहनतीवर पाणी फेरले होते आणि निकाल उशीरा लागणार अस जाहीर झाला. अस मनतात की "सब्र का फल मिठा होता है" आणि शेवटी काल निकाल लागला आणि प्रणय नीकोडे हा बी. एस.एफ. मध्ये तर भास्कर नेताजी गावडे हा सि. आर. पी.एफ. मध्ये या दोघांची ही निवड झाली. त्याबद्दल या दोघांचे ही गावामध्ये सर्व ठिकाणी कौतुक होत आहे..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने