(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांनी काल भद्रावती ला भेट देऊन नाग मंदिराचे दर्शन घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भद्रावती तर्फे त्यांचा पुष्पमाला अर्पण करून सत्कार करण्यात आला. मंत्रीमहोदयांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ऑर्गनायझेशन फार राइट्स ऑफ ह्युमन जिल्हा शाखा चंद्रपूर संघटनेचे वतीने, अध्यक्ष *संजय राव बोधे, सचिव कैलास उरकुडे, कोषाध्यक्ष राजेश कुंभारे, उपाध्यक्षा वासंती बहादुरे, कार्याध्यक्षा विद्याताई पाजनकर यांनी गृह राज्यमंत्री महाराष्ट्र शासन नामदार अनिल देशमुख यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले व चर्चा केली. त्यांच्या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले. याप्रसंगी आपल्या संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 21- 12 -2019 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 12 हजार 500 शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना 11 महिन्याच्या तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात वर्ग केल्यामुळे फार मोठी गंभीर समस्या निर्माण झाल्याची वास्तविकता कथन करून सांगितली. त्यांचा प्रश्न भविष्यात गंभीर स्वरूप धारण करून एक चळवळ निर्माण करणार आहे. या पूर्वीच्या शासनाने 1995 च्या पूर्वी सेवेत असणाऱ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र न मागता त्यांना सेवा संरक्षण दिले होते ,परंतु या सरकारने मात्र सरसकट सर्वांनाच अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे सर्वांची सेवा धोक्यात आलेली आहे व त्यांना बोगस म्हणून डिवचून स्वाभिमानाचा अपमान केलेला आहे. त्यांचे आर्थिक लाभ सुद्धा रोखून धरण्यात आलेले आहेत. हा अधिसंख्य कर्मचाऱ्यावर फार मोठा अन्याय आहे . याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवीला जाणार असून आफ्रोह संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांचे नेतृत्वात लवकरच आक्रोश मोर्चाचे आयोजन मुंबई मंत्रालयावर करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष *संजय राव बोधे व जिल्हा सचिव कैलास उरकुडे यांनी* सांगितले. याकरिता सर्व अन्यायग्रस्त कर्मचारी बांधवांनी एकजुटीने या समस्येचा ताकतीने मुकाबला करण्याचे विनंती सर्वांना करण्यात आली.