छत्रपती संभाजीनगर:- छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे सुरू असलेल्या पोलीस भरतीत (Police Recruitment) एका २३ वर्षीय तरुणाचा १६०० मीटर धावताना मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलीस होण्यासाठी आलेल्या या तरुणाचा मैदानावरच प्राण गेल्याने (police recruitment runner death) भरती प्रक्रियेला उपस्थित असलेल्या उमेदवारांवर शोककळा पसरली आहे. शनिवार २१ फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात मैदानी चाचणी सुरू असताना ही घटना घडली. (Chhatrapati Sambhajinagar)
मैदानात नेमकं काय झालं?
मृत तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे (Sangram Dhoniram Shinde Death) असे असून तो सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता. पोलीस दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून कठोर सराव करत होता. पोलीस भरती प्रक्रियेसाठी तो छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाला होता. शनिवारी सकाळी सुमारे ०८:१५ वाजता शहरातील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू होती. त्यात सहभागी झालेल्या संग्रामने धाव सुरू केली; मात्र काही अंतर पार केल्यानंतर त्याला अचानक चक्कर आल्याचे सांगितले जात असून धावत असतानाच तो मैदानावर कोसळला. ही बाब लक्षात येताच तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाने तात्काळ धाव घेतली.
मृत्यूचे नेमके कारण?
उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला उचलून घाटी रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

