पोंभुर्णा:- शहर मार्गांवर असलेल्या उमरी पोतदार या गावातील घरात कोणी नसल्याची संधी साधुन चोरट्यांनी अट्ठेचाळीस हजार रूपयाचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 20/02/26) रोजी सायंकाळी निष्पन्न झाली.
उमरी पोतदार येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच मंगेश यादव उपरे यांचे घर पोंभुर्णा मार्गांवर आहे. मागील दोन दिवसापासून साळभाऊ कडे वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने बल्लारपूर येथे गेले होते.घरी कुणीच नसल्याने घराला कुलुप असल्याची संधी साधत चोरटयांनी लोखंडी राडाच्या सहाय्याने कुलुप तोडुन घरात प्रवेश करून घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करून दोन कपाट तोडुन त्यातील साहीत्य लंपास केले. चोरटयांनी सोने व नगदी रोख रकमेसह महापुरुषांचे फोटो फ्रेम तर महत्वाचे कागदपत्रे चोरून नेले आहेत.
मंगेश उपरे यांच्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी आलमारीतील लाकरमध्ये ठेवलेले नगदी रकम 30,000 रुपये व सोन्याचे दोन डोरले व मणी 06 ग्राम जुने वापरत अदाज किमत 15,000 रुपये व नाकातील नथ 1.5 ग्राम जुने वापरते किमत 3,500 रुपये असा एकुण 48,500 ख़पयाचा मुदेमाल व रोख रकम कोणीतरी अज्ञात ईसमाने घराचे समोरील दाराचा कुलुप तोडुन घरात शिरून लोखंडी आलमारी चा लाकर तोडून मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी मंगेश उपरे यांच्या फिर्यादीवरून उमरी पोतदार येथील सब पोलीस ठाण्यात प्रथम खबर क्रमांक 0026/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (बी एन एस) 2023 अधिनियम अंतर्गत कलम 331(4), 305(a) भादवीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार येथील ठाणेदार राहुल ठेंगणे यांच्या मार्गदर्शनात तापसी अधिकारी गणपत आत्राम, प्रवीण असुटकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून घटनेचा तपास केला असून लवकर अज्ञात चोरटयांचा सापळा रचून पकडण्यात येईल असा आश्वासन यावेळी मंगेश उपरे यांना देण्यात आला.

