Top News

वीर सावरकर म्हणजे देशभक्तीचे धगधगते अग्निकुंड:- गुरुदास कामडी.


Bhairav Diwase.        Feb 28, 2021
चंद्रपूर:- भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक सोनेरी पान होते .स्वातंत्र्याच्या इतिहासातले हे एक तेजस्वी पर्व आहे .पारतंत्र्याच्या गडद व भीषण अंधकारात अखंडपणे तेवत राहणारी धगधगती मशाल होती. या मशालीने असंख्य तरुण क्रांतिकारकांची अंतःकरणे पेटवली . सावरकरांचे व्यक्तिमत्व हे केवळ अष्टपैलू नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला असंख्य आयाम होते.

  स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते ? ते अखंड हिंदुस्थानचे पुरस्कर्ते होते. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या मंत्राचे द्रष्टे होते . क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते . त्या कार्यासाठी निर्माण केलेल्या मित्रमेळा व अभिनव भारत संघटनेचे निर्माते होते. पारतंत्र्याच्या काळोखाला चिरणारा प्रकाशमय किरण होते . पतीत पावन संघटना निर्माण करून समाजात समरसतेची जाणीव निर्माण करणारे प्रेषित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रूपाने पारतंत्र्याच्या कालखंडातील एक कालखंड देशभक्तीचा दिव्य तेजाने चमकून गेला . सावरकरांनी लोकांना कशासाठी जगावे व कशासाठी मरावे हे शिकविले व सांगितले. आपली भारत माता परकीयांच्या जाचातून मुक्त व्हावी म्हणून त्यांनी जीवनातील साठ वर्ष प्राण यज्ञ केले . वीर सावरकर म्हणजे देशभक्तीचे धगधगते अग्निकुंड होते आज भारताच्या सार्वभौमत्वावर होत असलेल्या आक्रमण याप्रसंगी युवा पिढी समोर वीर सावरकरांचे विचार जे सत्य आहे . शिवाय सुंदर व प्रेरणादायी आहे . स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रूपाने पारतंत्र्याच्या कालखंडातील एक कालखंड देशभक्तीच्या दिव्य तेजाने चमकून गेला असे प्रमुख वक्ता गुरुदास कामडी यांनी सांगितले.

सन्मित्र सैनिकी विद्यालय चंद्रपूर येथे दिनांक २६फेब्रुवारी२०२१ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे कमांडंट सुरेंद्रसिंह राणा  होते. प्राचार्या कु. अरुंधती कावडकर प्रमुख वक्ता गुरुदास कामडी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ भारत माता व स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आला.  जयस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहमहं यशोयुतां वंदे हे गीत आकाश देऊरकर,रुद्र चंदेल,यश मोडक.बळीराम डफडे,यश मोर्हुले,आर्यन घोनसे या विद्यार्थ्यांनी सादर केलेले. वीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील थोर क्रांतिकारक होते . सावरकरांनी तरुणांना शिस्त लावून देशभक्तीची भावना निर्माण केली. सावरकरांनी सैनिकी शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांच्या विचारांमुळे देशात शालेय शिक्षणात सैनिकी शिक्षणाचा समावेश करण्यात आला . आपण सावरकरांच्या विचारांचा आदर्श ठेवून स्वतःमध्ये शिस्त निर्माण करून एक शिस्तबद्ध समाज घडवला पाहिजे. असे विद्यालयाचे कमांडंट सुरेन्द्र सिंह राणा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आव्हान केले . स्वराज्य ,स्वधर्म व स्वातंत्र्य या सर्वांची पायमल्ली होत असताना अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमराने  ब्रिटिशांच्या विरोधात भारतीय जनमानसात असंतोष निर्माण केला. राष्ट्रीयत्वाचा पाया म्हणजे थोर विभूतींच्या इतिहास . अठराशे सत्तावनचा उठावाने देशाला जागृत केले. देशाच्या स्वाभिमान रक्षणार्थ क्रांतिकारकांनी समरांगण गाठले. आयुष्यभर अहिंसेचा जप करणाऱ्या गांधींचा मृत्यू हा हिंसात्मक मार्गाने तर हाती शस्त्र घेतल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. अशा क्रांतिकारी  विचारांच्या सावरकरांचा मृत्यू अहिंसात्मक झाला . स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना गुरुदास कामडी यांनी सांगितले . 

        दिनांक  २० फेब्रुवारी २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त वाद विवाद स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. याचा निकाल संजय देशपांडे यांनी जाहीर केला. स्पर्धेतील सहभागी वृषभ अस्वले, कुणाल बोबडे ,समिक्ष नगराळे, अमन बोकडे , विजय भजभुजे, करण कराडे शुभम तेलमासरे या विजेत्या स्पर्धकांना प्रमुख अतिथी कमांडंट सुरेंद्रसिंह राणा, प्राचार्य कु. अरुधंती कावडकर,गुरुदास कामडी क यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यक्रम प्रमुख विनोद एडलावार यांनी केल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने