Click Here...👇👇👇

गोवंश तस्करांवर कारवाई करा, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी.

Bhairav Diwase
ठाणेदारांना निवेदन सादर.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
 भद्रावती:- भद्रावती तालुक्यात गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून ही तस्करी करणा-यांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी येथील आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे येथील ठाणेदाराला दिलेल्या निवेदनातून नुकतीच करण्यात आली आहे.

           निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे भद्रावती तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून पोलिस प्रशासनाच्या मदतीने गोवंश तस्करी रोखण्याचे कार्य केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलखान्यात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गोवंश पकडल्यानंतर पोलिस १९६० च्या कायद्यानुसार कारवाई करतात.त्यामध्ये गोतस्कर न्यायालयातून गोवंश सोडविण्यात यशस्वी होतात.हा कायदा कत्तलखान्यात घेऊन जाणा-या जनावरांना वाचविण्यास असक्षम आहे.कारण या कायद्यामुळे तस्करी नाही,तर मानहानी रोखली  जाते. याउलट आपल्याकडे गोवंश हत्याबंदी सुधारणा कायदा २०१५ हा सक्षम कायदा आहे. या कायद्याचा वापर करुन गोवंश तस्करीला आळा घालावा अशीही मागणी मनीष भटवलकर, विवेक दुर्गे, नितीन बावणे, कबीर देवगडे यांनी निवेदनातून केली आहे.