जाहिरात... Advertisement... विज्ञापन

नागलोन युजी टू ओसी विस्तारीत कोळसा प्रकल्प राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे रखडला:- हंसराज अहीर #Chandrapur

महाजेनकोला कोळसा खरेदी करण्याची अनुमती देवून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा

चंद्रपूर:- वेकोलि माजरी क्षेत्रा अंतर्गत असलेला नागलोन युजी टू ओसी कोळसा खाण विस्तारीकरण प्रकल्प राज्य सरकार महाजेनकोस कोळसा खरेदी करण्याची अनुमती देत नसल्याने हा महत्वांकांक्षी विस्तारीकरण प्रकल्प रखडला असल्याचा आरोप करून राज्याला कोळशाची नितांत आवश्यकता असल्याने सरकारने महाजेनकोला कोळसा खरेदीचा करार करण्याची अनुमती द्यावी अशी आग्रही भूमिका पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी घेतली असून या विषयी त्यांनी मुख्यमंत्रयांना पत्रा पाठविले आहे.
नागलोन विस्तारीकरण प्रकल्पाकरीता पाटाळा गावातील 224.24 हेक्टर जमीनी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या संदर्भात वेकोलिने 21 एप्रिल 2020 रोजी सेक्शन 4 तर 03 सप्टेंबर 2020 रोजी सेक्शन 7 लावले आहे. परंतू कोळसा खरेदीचे अॅग्रीमेंट न झाल्याने पुढील सेक्शनची कार्यवाही अधांतरी लटकली आहे. या प्रकल्पात 277 नोकऱ्या अपेक्षीत आहेत. सदर प्रकल्पामध्ये उच्चप्रतीचा कोळसा असल्याने राज्य सरकार व महाजेनकोने कोळसा खरेदीचा करार करण्यास पुढाकार घ्यावा असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
कोळसा खरेदी कराराअभावी प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव शेतीच्या मोबदल्यापासून तसेच नोकरीपासून सुध्दा वंचित आहेत.
भूमिअधिग्रहण प्रक्रीया प्रारंभ न झाल्याने संबंधीत शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यास अडचण निर्माण झाली आहे. या उद्भवलेल्या अडचणीमुळे हे प्रकल्पबाधित शेतकरी कोंडीत सापडले असल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून महाजेनकोला नागलोन या विस्तारीकरण कोळसा प्रकल्पातील कोळसा खरेदीस अनुमती देवून रखडलेला हा कोळसा प्रकल्प मार्गी लावण्यास पुढाकार घ्यावा असेही हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्रयांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
चिचांली रिकास्ट कोळसा प्रकल्पाचा तिढाही सोडवावा:- अहीर
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिंचोली रिकास्ट प्रकल्पास सेक्शन 11 लागुन 5 वर्ष लोटली असतांना केवळ कोळसा खरेदी करार होवू न शकल्याने हा प्रकल्पसुध्दा सुरू होवू शकलेला नाही. या प्रकल्पामध्येही चिंचोली, सुब्बई, डोंगरगाव, कवीटपेठ आदी गावातील सुमारे 182 हेक्टर जमीनी अधिग्रहित होणार आहेत. एकुण 205 नोकऱ्या प्रस्तावित आहेत. परंतू कोळसा खरेदी करार न झाल्याने या शेतकऱ्यांनाही मोबदला व नोकऱ्यांपासून वंचित रहावे लागत आहे.
शेतीचा विकास, शेतीची विक्री, आर्थिक व्यवहार करण्याची शेतकÚयांना मुभा नसल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक दृष्ट्या खचले आहे. रोजगाराच्या संधीअभावी शिक्षीत बेरोजगार ग्रसीत आहेत त्यामुळे वरील दोन्ही प्रकल्पात कोळसा खरेदी करार करण्यास पुढाकार घेवून महाजेनकोला याकरीता अनुमती दिली जावी असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत