Top News

आरोग्यासाठी गॅसचा वापर करणे आवश्यक:- भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर #Chandrapur

25 गरजूंना बगळ खिळकी येथे भाजयुमोने केले उज्ज्वला गॅसचे वितरण
चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक उपक्रम शेवटच्या माणसासाठी आहेत. त्यांची सेवा करण्याचा निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. हाच धागा पकडून लोकनेते आ सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना काळात प्रचंड मदत कार्य केले. हे कार्य अजूनही सुरू आहे.त्याच धर्तीवर गरजूनां पंतप्रधान उज्ज्वला गॅसचे वितरण केले जात आहे.पर्यावरणासह मातृशक्तीच्या आरोग्यासाठी घरगुती गॅसचा वापर गरजेचा आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले.ते भाजयुमो चंद्रपुर तर्फे आयोजित प्रधानमंत्री उज्वला गॅस वितरण कार्यक्रमात 29 नोव्हेंबरला बगळ खिळकि येथे कार्यक्रमाचे नेतृत्व करतांना बोलत होते.
माजी वित्त मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, भारतीय जनता पक्ष जिल्हा चंद्रपूर चे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चा चे सचिव प्रवीण उरकुडे यांच्या पुढाकारातुन घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला चंद्रपूर महानगर जिल्हा अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासंगोट्टूवार, नगरसेवक विशाल निंबाळकर , भाजयुमो उपाध्यक्ष यश बांगडे, भाजयुमो उपाध्यक्ष स्नेहीत लांजेवार, सचिव प्रविण उरकुडे, भाजयुमो उपाध्यक्ष आकाश मस्के, जेष्ठ समाज सेवक मयुक जी शेख, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ता गौतम नगराळे, भारतीय जनता पार्टीचे सचिव राकेश बोमनवार, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी साजीद पठाण, राहुल नगराळे, रामजी यादव, अमन वाघ, शुभम खेडेकर, वृषभ फुलझले, तेजस काकडे, रोहन चालेकरं, गौरव कुशन वार यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमामध्ये 25 लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन, गॅस सलेंडर व शेगडी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिलेश रोहिदास, संचालन आकाश म्हस्के यांनी केले व आभार प्रदर्शन प्रवीण उरकुडे यांनी मानले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने