बंडु बुरांडे यांची निवेदनातून मागणी
पोंभुर्णा:- तालुक्यातील अनेक गावात मागील महिन्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून त्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सरपंच तथा वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष बंडू बुरांडे यांनी वनविभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गेल्या एक महिन्या पासून पोंभूर्णा परिक्षेत्रातील अनेक गावामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे.यात शेतात काम करणाऱ्या महिलेला ठार मारले असुन अनेकांना जखमी केले आहे , तसेच जनावरावर हल्ला करून प्राण घेतले आहे त्या वाघावर योग्य ती उपाय योजना करून दहशत करीत असलेल्या वाघाचे बंदोबस्त करणे गरजेचे आहे . सध्या स्थितीत शेतक - यांचे शेतामध्ये कापूस , धानचे पूजने आहे . त्यामुळे शेतक - यांना शेतामध्ये जाने गरजेचे असल्याने शेतकरी रोज शेतात जातात त्यावेळी कधीही वाघ त्यांचेवर हल्ला करून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोंभूर्णा परिक्षेत्रातील दहशद पसरवित असलेल्या नरभक्षक वाघाचा लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष बंडू बुरांडे यांनी वनविभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना तमुस अध्यक्ष ताराचंद गेडाम, अध्यक्ष समृद्धी शेतकरी संघ नरेंद्र पिपरे व गावातील नागरिक उपस्थित होते.