जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चांदा क्लब ग्राउंड येथील मीना बाजार संचालकाला 50 हजार रुपयांचा दंड; कोरोनाचे नियमभंग #Chandrapur

चंद्रपूर शहर महानगरपालिकेची कारवाई
चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड येथे मागील महिनभरापासून माऊली एकता मीना बाजार सुरू आहे. मात्र, येथे राज्य शासनाने निर्देशित केलेल्या आणि महानगरपालिकेने सूचित केलेल्या कोरोणा-19 नियमांचे पूर्णपणे भंग केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या पथकाने माऊली मीना बाजार येथे जाऊन पाहणी केली. त्यात नियमाचे भंग होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्या प्रकरणी माऊली एकता मीना बाजार व्यवस्थापक चंद्रभूषण प्रेमराज गजभिये यांच्या विरोधात 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
या मीना बाजारात येणाऱ्या नागरिकांत कोणतेही सामाजिक अंतर राहत नाही. गर्दीवर नियंत्रण नसून, मास्क आणि सीनिटायझर व्यवस्था नाही. त्यामुळे कोरोना आजार पसरण्याची भीती नाकारता येत नव्हती. याबाबत प्राप्त तक्रारीवरून मनपाने कारवाई केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत