Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पोंभुर्णा तालुक्यातील नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा:- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे. #Pombhurna

भाजपाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण यांना निवेदन.
चंद्रपूर:- गेल्या काही महिन्यांपासून पोंभुर्णा तालुक्यात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा. अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
तालुक्यातील कसरगट्टा, गंगापूर, बोर्डा बोरकर, घनोटी, खरमत, चेकहत्तीबोळी, केमारा, चिंतलधाबा, चेक आष्टा आणि सेल्लुर (नाग.) या गावपरीसरात गेल्या काही महिन्यांपासून नरभक्षक वाघाचे हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांत बेबीताई धोडरे व पुरुषोत्तम मडावी हे मृत पावले असून केशव रामटेके, राहुल चव्हाण, कांताबाई चलाख, संदीप शामावर व गजानन मोरे हे पाच जण जखमी झाले आहेत. यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण असून गावकरी जीव मुठीत धरून जगत आहेत. अशा परिस्थितीत सदर नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मुख्य वनसंरक्षकांना निवेदनातून केली.
यावेळी, पं.स. सभापती कु. अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, पं.स. सदस्य विनोद देशमुख, रोशन ठेंगणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय मस्के, विलास वेलादी, विनोद कानमपल्लीवर, राहुल पाल, संजय जवादे, अरूण कुत्तरमारे, परशुराम रोहनकर व नेहरु मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत