Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

ही तर...! बाहेरून आलेल्या पुढार्‍यांची चमकोगिरी #Korpana

(प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर ताजणेकडून अनेक आक्षेपार्ह्य मुद्दे उपस्थित, पर्यावरण मंत्र्यांना निवेदन)
कोरपना:- गडचांदूर शहराचा नावलौकिक करणारा व शहर विकासासाठी कारणीभूत ठरणाऱ्या माणिकगड सिमेंट उद्योगाच्या प्रदुषणामुळे शहरवासीयांचे आरोग्य खुपच बिघडत आहे. यासाठी नेमके या सिमेंट उद्योगाला जबाबदार धरून शहरात विविध उपक्रम राबविले जात आहे. हे अत्यंत चुकीचे व बे-जबाबदार कार्य याठिकाणी बाहेरून आलेले काही राजकीय पक्षाचे लोक आपली राजकीय चमकोगिरी तसेच जाहिरात बाजीसाठी करत असल्याचे आरोप गडचांदूरातील मुळनिवासी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना कोरपना तालुकाध्यक्ष सुधाकर ताजणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदनातून केले आहे. माणिकगड सिमेंट कंपनी प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर ताजणेंची भूमिका लक्षवेधी ठरत असून यांनी पत्रात आनेक आक्षेपार्ह्य मुद्दे उपस्थित केले आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, मागील 35 वर्षापुर्वी हा सिमेंट प्रकल्प चांदूर येथे आला तेव्हा हे शहर लहानसे गाव होते. प्रकल्प सुरू झाल्यानंतर याचे नाव पुढे गडचांदूर असे नावारूपास आले.या शहराच्या शेजारी पुन्हा एल अँड टी नावाचा एक सिमेंट प्रकल्प आल्यामुळे गडचांदूर जनसंख्या व व्यापारात वाढतच गेला.हे केवळ माणिकगड सिमेंट प्रकल्पामुळेच घडले ही बाब नाकारता येत नाही.एकेकाळी जुन्या हनुमान मंदिराकडील हे लहान गाव आजघडीला येथील वाढते उद्योगधंदे व जनसंख्येने फुगत असून उद्योग सभोवताल लोकवस्तीत वाढ होत आहे.असा मजकूर ताजने यांनी निवेदनात नमूद केला आहे.
उद्योग म्हटले तर प्रदुषण होणारच,याच्या संरक्षणासाठी शासकीय नियमावली व प्रदूषण नियंत्रण मानकतत्वांच्या पालनासाठी मोठ्याप्रमाणात वृक्षलागवड व संरक्षण ही संकल्पना या लाभकारी लोकांनी राबवली पाहीजे. गडचांदूरात प्रदुषण वाढत आहे आणि याविषयी चंद्रपूरचे आमदार जोरगेवार विधानसभेत विचारत आहे हे कसे? स्थानिक आमदारांचे कार्यकर्ते तसेच न. प. सत्ताधारी जनता दरबार घेऊन प्रदुषणाच्या मुद्यावर चर्चा का करत नाही? असे प्रश्न उपस्थित करत, काही महिन्यापूर्वी बाहेरून येथे आलेले राजकीय पुढारी स्वतःची राजकीय चमकोगिरी करण्यासाठी असले उद्योगधंदे करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. असे आरोप करत वास्तविक पाहता या उद्योगामुळे आमचे जीवनमान उंचावले. आमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे. आमच्या दैनंदिन जीवनात या उद्योगांचे विशेष महत्त्व असल्याने आपण सदर बाब गंभीरतेने घेणे गरजेचे नाही अशी विनंती वजा मागणी सुधाकर ताजणे यांनी पर्यावण मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत