मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांची निवेदनाद्वारे मागणी
बल्लारपूर:- बल्लारपुर तालुक्यातील येनबोडी किन्ही ते मानोरा हा रोड जड वाहतुकी ने खराब झालेला असुन रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहे. यामुळे या रस्तयावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्यामुळे कधी काळी मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र याकडे आजपर्यंत कुणाचेच लक्ष नसल्याने नागरीक अशा रस्त्याअभावी त्रस्त झाले असुन सबंधीत विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन येनबोडी- किन्ही-मानोरा या मुख्य मार्गाचे नुतनीकरन या सात दिवसाच्या आत करावे अन्यथा मनसेकडून मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल आणि याला जबाबदार संबधीत प्रशासन असेल असे निवेदन मनसेचे जिल्हाअध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मनसे जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा) किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रपुर यांना निवेदन दिले त्यावर मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रपुर यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्याच्या नुतनीकरणास लवकरात लवकर सुरुवात करण्यास तेथील ठेकेदारांना सांगलीत. अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करन्यात येईल असा ईशारा देण्यात आला.
निवेदन देताना कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष, मनविसे शोभाताई वाघमारे महीला सेना जिल्हा उपाध्याक्ष, चंद्रपुर तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, क्लपना पोतर्लावार बल्लारपुर तालुका महिलासेना अध्यक्ष, क्रिष्णा गुप्ता, मनोज तांबेकर, वाणी सदालावार, पियुश दुपारे, सुयोग घुवलकर, राज वर्मा, सचिन बाळस्कर, महेश गडपेल्लीवार, अनुरोज रायपुरे, क्रिष्णा पोतर्लावार, उपस्थीत होते.