कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांचे बेमुदत उपोषण मागे #chandrapur

रस्त्याच्या कामाला तातळीने सुरुवात करणार

अंतरगाव येथील पुलाचे काम २५ मे पर्यंत पूर्ण होणार
नारंडा फाटा ते पवनी रस्त्यावरील पुलाचे काम तात्काळ पूर्ण करून डांबरीकरण करणार

अंतरगाव येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंदिस्त नालीचे बांधकाम करून,शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर रपट्याचे बांधकाम लवकरच सुरू करणार
पोंभुर्णा:- कोरपना तालुक्यातील एन्यूटी हायब्रिड अंतर्गत सुरु असलेल्या नारंडा फाटा-अंतरगाव बु-सांगोडा फाटा-गाडेगाव-कवठाळा-नांदगाव सूर्या-पवनी ह्या रस्त्याचे काम मागील गेल्या ४ वर्षांपासून सुरू आहे परंतु सदर रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाहीत सदर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार यासंदर्भात पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला तसेच १३ फेब्रुवारी २०२२ ला तालुक्यातील अंतरगाव बु येथे रास्ता रोको आंदोलन सुद्धा केले तेव्हा अधिकारी व कंत्राटदारांनी लवकरात लवकर पुलाचे व रस्त्याचे बांधकाम पूर्ण करू असे सांगितले परंतु ३ महिने लोटूनही काम पूर्ण झाले नाही त्यामुळे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी १० मे पासून अंतरगाव बु येथे बेमुदत उपोषणाला सुरवात केली होती.
त्यांनतर राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे,भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी उपोषणाला भेट दिली,सदर बाब मान्यवरांनी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली.त्यांनतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत रस्त्याच्या मागण्यासंदर्भात योग्य तोडगा काढायला सांगितले.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कार्यकारी अभियंता सुनील कुंभे,सहायक कार्यकारी अभियंता आकाश बाजारे यांनी उपोषण स्थळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची भेट घेत मागण्या समजून घेतल्या.
यामध्ये प्रामुख्याने नारंडा फाटा-अंतरगाव-कवठाळा-पवनी रस्त्याचे व पुलाचे बांधकाम तातळीने पूर्ण करणे.अंतरगाव येथील पुलाचे बांधकाम २५ मे पर्यंत पूर्ण करणे,अंतरगाव येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंदिस्त नालीचे बांधकाम व शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर रपट्याचे बांधकाम १४ मे पासून सुरू करणे,ज्या पुलाचे बांधकाम होणार नाही त्या पुलाच्या दोन्ही बाजूला तातळीने डांबरीकरण करणे,नारंडा फाट्यावर सिमेंट काँक्रीटीकरण करणे,दालमिया सिमेंट कंपनी सामोरील पुलाचे बांधकाम संबधीत कंत्राटदारांनी हमी घेतल्यास पावसाळ्यापूर्वी करणार अन्यथा सदर पुलाचे बांधकाम पावसाळ्यानंतर करणार,तसेच इरई बोरगाव फाट्याजवळील ३-४ किमीचे डांबरीकरणाचे पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण करणार,तसेच अंतरगाव येथील शिवाजी शाळेजवळ गतिरोधक बसविण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविणार,तसेच शाळेच्या दोन्ही बाजूला बोर्ड बसविणार असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता सुनील कुंभे यांनी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांना देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
            त्यानंतर अंतरगाव येथील जेष्ठ नागरिक बंडू पाटील वडस्कर यांनी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांना सरबत पाजून उपोषणाची सांगता केली. यावेळी उपोषणाला परिसरातील गावातील नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला तसेच उपोषणाला पोलीस विभाग,आरोग्य विभाग यांनी सहकार्य केले त्याबद्दल भाजयुमो आशिष ताजने आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत