Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

भाजयुमोचा बुधवारी एल्गार #chandrapur

विश्वासघाती महाविकास आघाडी सरकारचा करणार धिक्कार
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- पेट्रोल डिझेल वरील राज्य सरकारचा टॅक्स 50% नी कमी करावा,या प्रमुख मागणीला घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे बुधवारी 25 मे ला दु.4 वाजता गांधी चौक येथे एल्गार पुकारण्यात येणार आहे.
लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो जिल्हाध्यक्ष (महानगर) विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असून यावेळी महामंत्री प्रज्वलंत कडू,सुनील डोंगरे,प्रमोद क्षीरसागर,मंडळ अध्यक्ष संजय पटले,हिमांशू गादेवार,गणेश रामगुंडमवार,गजेंद्र भोयर व अमित बोरकर यांची उपस्थिती राहणार आहे.
दारूवरची कर कपात 50% 'मग राज्य सरकार पेट्रोल व डिझेल वरच्या करात कपात का करत नाही?असा प्रश्न विशाल निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे.हे तर दारुड्यांसाठी चे सरकार असून केंद्र सरकारने जे करून दाखवले ते आता,राज्य सरकार करावे. नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या विश्वासघातकी आघाडी सरकार चां धिक्कार सर्व जनतेनी करावा असेही आवाहन निंबाळकर यांनी केले आहे.
केंद्र सरकार चां टॅक्स आता फक्त - 19 रु
परंतु,राज्य सरकार चां टॅक्स - 29रु असल्याने ईंधन दरवाढ कुणामुळे ?याचा जनतेनी विचार करावा.महाविकास आघाडी सरकारचा खोटारडे पणा झाला उघड झाला असून एकही रुपया राज्य सरकारने कमी केला नाही.म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी विशेषतः युवक युवतींनी एकत्र यावे असेही आवाहन भाजयुमो तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत