Top News

घुग्घुस येथील विजेच्या लपंडावावर तोडगा काढण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्यात बैठक संपन्न #chandrapur


रात्रपाळीस दोन कर्मचारी ड्यूटीवर लावण्यासह येत्या आठ दिवसांत वीजेचा पुरवठा सुरळीत करण्याचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांचे आश्वासन
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- सोमवार, २३ मे रोजी घुग्घुस येथील सहाय्यक अभियंता वीज वितरण यांच्या कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्यात गेल्या महिन्यापासून घुग्घुस शहरात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावासंदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक पार पडली.
मागील सप्ताहात मुख्य अभियंता सुनील देशपांडे तसेच अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांना निवेदन देऊन येत्या पंधरा दिवसांत विजेचा लपंडाव थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याआधी दिला होता. त्याअनुषंगाने आज ही बैठक घेण्यात आली.
बैठकी दरम्यान, घुग्घुस शहरातील वारंवार खंडित होणारा विजपुरवठा सुरळीत करणे, घुग्घुस शहरात विविध ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर लावणे, कार्यालयात रात्रपाळीस दोन कर्मचारी ठेवणे, बेल्लोरा पाणी टाकी जवळ विद्युत पुरवठा सुरू करणे, व्होल्टेज योग्य करणे, नवीन मिटर देणे, लॉयड्स कंपनी जवळील ६६ केव्हीचा सब स्टेशन कालबाहाय्य झाला असल्याने त्याठिकाणी नवीन ३३ केव्हीचा सबस्टेशन सुरु करणे, घुग्घुससह पांढरकवडा येथील विजेचा लपंडाव थांबविणे आणि वीज पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्याबाबत सुयोग्य उपाययोजना करणे. अशा विविध विषयांवर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
चर्चेदरम्यान आलेल्या सर्व विषयांच्या सोडवणूकीसाठी आपण तातडीने कार्यवाही करू तसेच आजपासून रात्रपाळीस दोन कर्मचारी ड्यूटीवर ठेवण्यात येतील व येत्या आठ दिवसांत वीजेचा पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सभापती सौ. नितूताई चौधरी, पांढरकवडा सरपंच सुरज तोतडे, विनोद चौधरी, साजन गोहने, सुरेन्द्र जोगी, मोमीन शेख, अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रपूर विभाग सुहास पडोळे, सहाय्यक अभियंता चंद्रपूर ग्रामीण उप विभाग सतीश डाखरे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने