तहसीलदार यांच्या दुर्लक्षित पणामुळे आदिवासी बांधव योजनेपासून वंचित? #Chandrapur


सिंदेवाही तहसील कार्यालयातील प्रकार
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तहसील कार्यालय अंतर्गत विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना मंजूर करून बॅक ऑफ इंडिया चे खाते नसल्याचे कारण देत मागील आठ महिन्यांपासून पेंदाम दाम्पत्याला वंचित राहावे लागत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे.
सविस्तर वृत असे की तालुक्यातील गुंजेवाही येथिल तुळशिराम चंद्रशा पेंदाम व त्यांच्या पत्नी अनुसया पेंदाम यांचे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभार्थी म्हणून ४/२/२०२२ ला मान्यता दिली व एक हजार रुपये मासिक वेतन मंजूर चे आदेश सदर कार्यालयाने दिले.
त्यानंतर तुळशिराम चंद्रशा पेंदाम यांनी सिंदेवाही तहसील कार्यालयातील श्रावण बाळ विभागात बॅक ऑफ इंडिया शाखेचे संयुक्त बॅंक असलेले खाते दिले. त्यानंतर तेथील कर्मचारी याने संयुक्त खाते चालत नसल्याचे कारण पुढे करून नविन खाते काढण्यास लाभर्थ्यांना सांगितले. त्यामुळे पेंदाम दाम्पत्य हे निरक्षर असल्याने त्यांनी गुंजेवाही येथिल पोस्टाचे खाते काढून ते दिले. शासन निर्णय नुसार कोणत्याही राष्ट्रीयकृत बॅंकचे खाते किंवा पोस्टात खाते असणे आवश्यक आहे तसे योजना मंजुरी आदेश पत्रावर नमूद आहे. परंतु हे असताना सुद्ध तहसील कार्यालयातील कर्मचारी याने दुसरे खाते काढण्यास सांगून परत पाठवले.
कोरोना काळात पेंदाम दाम्पत्याला मोठ्या आर्थिक स्थितीत गुजराण करावी लागली. आर्थिक परिस्थिती नसल्याने पेंदाम दाम्पत्याने जुळवाजुळव करत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते काढून ते दिले. परत तेच कारण सांगून फक्त बॅक ऑफ इंडिया शाखेचे खाते काढून आणण्यास सांगितले व पेंदाम दाम्पत्याला परत पाठवले.
सदर तिनं वेळा बॅंकचे खाते काढून सुद्धा पेंदाम दाम्पत्याला श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना पासून वंचित राहावे लागत आहे. एवढ्या परीस्थितीत आठ महिन्यांपासून एक-एक हजार रुपये प्रमाणे दोघांनाही सोळा हजार रुपयाला मुकावे लागत असल्याने वरिष्ठ स्तरावर मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे माहिती पेंदाम दाम्पत्याने दिली.
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना विभागतील कर्मचार्याच्या नुसत्या हेकेखोर स्वभावामुळे व शासन निर्णयाचा पुरेपूर अभ्यास नसल्याने निरक्षर दाम्पत्याला वंचित राहावे लागत असल्याचे विदारक चित्र सिंदेवाही तालुक्यात दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत