Top News

जीवनात यशस्वी होण्यासाठी हवी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास:- यशवंत शितोळे chandrapur, pombhurna #sardarPatelmahavidyalayachandrapur


सरदार पटेल महाविद्यालयात करिअर कट्टा मार्गदर्शन शिबिर संपन्न


चंद्रपूर:- विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना जिद्द (stubbornness), चिकाटी (Persistence), आत्मविश्वास Confidence  आणि कठोर परिश्रम (hard work) करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कुणीही हरवु शकत नाही असे उद़्गार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे Yashwant (Shitole) यांनी व्यक्त केले

सर्वोदय शिक्षण मंडळ व्दारा संचालित सरदार पटेल महाविद्याल चंद्रपूर (Sardar Patel mahavidyalaya chandrapur), स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा मार्गदर्शन शिबिर (Career Katta, Guidance Camp)  चर्चासत्रात बोलत होते.




या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, मार्गदर्शक यशवंत शितोळे अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, प्राचार्य डॉ. लेमराज लडके शिंदे महाविद्यालय भद्रावती, रोहित वनकर समन्वयक करिअर कट्टा, नुरजहा बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महा. वणी, डॉ. अपर्णा धोटे समन्वयक करिअर कट्टा, निलकंठ शिंदे महा. भद्रावती, प्रा. डॉ. एस. बी. पाथर्डे समन्वयक करीअर कट्टा, प्रा. सुनिल चिकटे, डॉ. बोरकर, डॉ. प्रफुल्लकुमार वैद्य, डॉ. नागसेन शंभरकर, तसेच महाविद्यालय प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन (guidance) करताना यशवंत शितोळे यांनी म्हणाले की, विद्यार्थ्यांना (Students)  स्पर्धा परीक्षांची तयारी (competitive exam preparation), उत्तम करिअर (good career), चांगली नोकरी (good job), पदवी व पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम (good degree and post graduate course), मानसन्मान (respect), प्रतिष्ठा (reputation), पारितोषिके (prize) , बक्षीसे (awards) इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते. त्यामुळे सरळ सेवा  परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करावी. सिलेक्शन कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, रेल्वे रिक्रुटमेंट, बँकिंग आदि स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. उपलब्ध पदांची संख्या ही कधी शंभरात तर कधी हजारात असते. त्यात आपल्याला टिकायचे असेल तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. सरकारी नोकरीत जायचे असेल तर स्पर्धा परीक्षांना सामोरे जावेच लागते. त्यांचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती आत्मसात करावी लागते. मानव्यविद्या शाखेतील सर्व विषयांचा अभ्यास करावा लागतो.

आपल्या मार्गदर्शनामध्ये यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही याची खंत व्यक्त करत वेळेचे परिपूर्ण नियोजन करण्याचे महत्व विशद केले. त्याचबरोबर करिअर कट्टा उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे उपलब्ध ॲपच्या लॉगिन व विविध वैशिष्ट्ये याबद्दल भाष्य करत करिअरचा विचार करत असताना विद्यार्थ्यांनी वास्तववादी विचार करणे आवश्यक आहे, याकडे लक्ष वेधले.

महाराष्ट्र शासनातर्फे महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी तसेच त्यांच्यामध्ये उद्योजकतेसाठीचे आवश्यक कौशल्य विकसित व्हावे यासाठी सवलतीच्या दरामध्ये करिअर कट्टा हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे पदवीच्या प्रथम वर्षापासून या उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगभूत क्षमतेला माहिती तंत्रज्ञानाच्या योग्य वापराची जोड देत स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधणे क्रमप्राप्त ठरते, असे मत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनिल चिकटे, प्रास्ताविक प्रा. डॉ. संदेश पाथर्डे तर आभार डॉ. बोरकर यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने