Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भाच्याने केला दोन्ही मामावर धारदार शस्त्राने केला हल्ला #chandrapur #ballarpur #attack #suicide


दुखावलेल्या आईची तलावात उडी घेऊन आत्महत्या


बल्लारपूर:- आई-मुलामध्ये (aai-son)  किरकोळ कारणावरून घरगुती वाद (dispute) झाला आणि त्याचा परिणाम अत्यंत दुःखद झाला. मामाने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता नितिनने दोन मामांवर धारदार शस्त्राने वार केले, यात मामा जखमी झाले. या घटनेने दुखावलेल्या आईने तलावात उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली.

बल्लारपूर (Ballarpur) तालुक्यातील कोठारी (Kothari) गावात ही घटना घडली. पोलिसांनी हल्लेखोर नितीन मुरलीधर चटप (25) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूरपासून 10 किमी अंतरावर असलेल्या कोठारी येथे राहणाऱ्या मीना मुरलीधर चटप (57) यांच्या पतीचे 20 वर्षांपूर्वी निधन झाले. ती तिच्या भावासोबत तिच्या माहेरच्या घरात राहते. वडिलांच्या निधनाच्या वेळी नितीन चटप हा खूपच लहान होता, मात्र नितीन लहान असल्याने घरात वाद होऊ लागले. 22 नोव्हेंबर रोजी मीना आणि मुलगा नितीन यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला. हे पाहून नितीनचे मामा गोपाळा विठोबा विरुटकर व बाबाराव विठोबा विरुटकर हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता नितीनने दोन्ही मामांवर धारदार शस्त्राने वार केले.

ज्यात दोघे जखमी झाले. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी नितीनला अटक केली. या घटनेने दुखावलेल्या आई मीना हिने रात्री वनविभागाच्या जंगलाला लागून असलेल्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी 23 नोव्हेंबरला त्यांचा मृतदेह पाण्यात दिसला. माहितीच्या आधारे कोठारीचे एसएचओ तुषार चव्हाण हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाचा पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत