Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

खेळासाठी अपुऱ्या सोयी-सुविधमुळे खेळाडू धडकले कुलगुरुच्या कार्यालयावर #chandrapur #gadchiroli


गोंडवाना विद्यापीठांनी पंतप्रधानांच्या खेलो इंडियाच्या संकल्पनेचे वाजवले तीन-तेरा
गडचिरोली:- दि. 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2022 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या (Gondwana University gadchiroli) शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाने (Department of Physical Education and Sports) वार्षिक ऍथलेटिक्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे गोंडवाना विद्यापीठ पत्रकानुसार जिम्मेदारी घेतली होती.


सदर स्पर्धा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील मैदानावर घेण्याचे ठरवले, परंतु नियोजना अभावी स्पर्धा एम. आय. डी. सी ग्राउंड (ground) वर घेण्याचे निर्देश देण्यात आले. या स्पर्धेसाठी गडचिरोली, चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातून विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित झालेले होते

परंतु प्रत्यक्ष मैदानावर कुठलाच मंच तयार नव्हता. पिण्याचे पाणी ची सोय नव्हती, सावली सुद्धा नव्हती, खेळाडू जमेल त्या झाडाखाली स्वतःचे आणलेल्या दऱ्यावर बसले होते, तेवढेच नव्हे मुलींना कपडे बदलविण्यासाठी झाडांचा आडोश्याला जावे लागत होते. धावपट्टया सुद्धा व्यवस्थित नसून खडतर होत्या.
विद्यापीठाचे कुलगुरु किंवा त्यांच्यावतीने कुणीतरी जबाबदारी घेऊन कार्यक्रमाचे विस्तार उद्घाटन करून खेळाडू प्रतिनिधीच्या हातात जळती मशाल देण्याची रीत आहे. परंतु विद्यापीठाकडून कुठलीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने दूर दुरुन आलेल्या खेळाडूंची नाराजी झाली व त्यांनी नियोजनाच्या बहिष्कार केला आणि घोषणा देत होते. विद्यापीठ अंतर्गत खेळात उत्तम खेळाडूंची निवड करुन अश्वमेध स्पर्धेत पाठवले जाणार होते. त्यातून पुढे देशव्यापी वर या विद्यार्थ्यांमधून खेळाडूंना खेळवले जाऊ शकतील, परंतु अजूनही उद्घाटन न झाल्याने गोडवाना विद्यापीठातील स्पर्धक अश्वमेघात सहभागी होऊ शकतील का? असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. खेळाडूंचा रोष वाढत गेल्याने सर्व खेळाडूं कुलगुरुच्या कार्यालयावर धडकले. 

डॉ. प्रशांत बोकारे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू गडचिरोली यांच्याशी संपर्क साधला असता ते मी आता बाहेर विमानामध्ये आहे, असा उत्तर देऊन त्याबद्दल मला काही माहीत नाही असे सांगितले.


डॉ. अनिल हिरेखान कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना संपर्क साधला असता ही स्पर्धा आम्ही रद्द करून 25 ते 27 वरोरा येथे होणार आहेत असे सांगितले.

क्रीडा व शारीरिक विभाग संचालक डॉ. अनिता लोखंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत