पाच वर्षीय चिमुकलीवर युवकाने केला अत्याचार; नराधमास ठोकल्या बेड्या #Chandrapur #torture #sindewahi


सिंदेवाही:- पोलीस स्टेशन सिंदेवाही (Sindewahi) अंतर्गत इंदिरानगर, रत्नापूर येथील एका युवकाने पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार (torture) केला. बुधवारी दोन दिवसांनी मुलीची आंघोळ करून देताना आईला संशय आल्याने ही घटना उघडकीस आली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक (arrested) केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज डी. कुंभरे (२१, रा. इंदिरानगर, रत्नापूर) याने दोन दिवसांपूर्वी पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला. मुलगी लहान असल्याने कुणालाही काही सांगितले नाही. दोन दिवसांनंतर मुलीची आंघोळ करून देताना आईच्या लक्षात ही बाब आली आणि मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस विभागाकडे तक्रार दाखल केली.

सिंदेवाही येथील पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी घटनास्थळी येऊन अधिक तपास केला व आरोपी सूरज कुंभरे याला ताब्यात घेतले. मुलीला चंद्रपूर येथे नेऊन वैद्यकीय तपासणी केली व आरोपीवर ३७६ व पाॅस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत