Top News

ताडोबा क्षेत्रातील समस्त गावांना समान रोजगाराची संधी द्या:- सुरज ठाकरे #chandrapur


"१ कुटुंब १ रोजगार" ही योजना राबवा


चंद्रपूर:- महाराष्ट्रातील लोकप्रिय असलेल्या ताडोबा अभयारण्याच्या माध्यमातून मिळत असलेला रोजगार हा आजही ताडोबा क्षेत्रातील असलेल्या संपूर्ण गावांमध्ये गावकऱ्यांना मिळालेला नाही. 

चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांच्या सातत्याने प्राप्त होत असलेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी ताडोबा क्षेत्रातील रोजगारासंदर्भात प्रशासनाला सातत्याने पत्रव्यवहार करत सर्वांना समान रोजगाराची संधी मिळण्याकरिता पुढाकार घेतला आहे. कारण या भागातील बहुतांश गावकरी आजही बेरोजगारच आहेत. असे असताना देखील ‘सद्यस्थितीमध्ये ताडोबा अभयारण्याच्या माध्यमातून मिळत असलेला रोजगार हा इतर गावांपेक्षा सर्वात जास्त मोहर्ली या गावामध्ये व आजूबाजूच्या इतर ठराविक गावांमध्येच देण्यात आला असल्याने या क्षेत्रातील काही गावे वगळता बहुतांश गावातील नागरिकांना आजही रोजगारापासून वंचित आहेत. या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रोजगारावर जितका अधिकार येथील गावकऱ्यांचा आहे, तितकाच अधिकार या क्षेत्रामधील ‘ज्या गावांचे पुनर्वसन झाले त्यांच्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा देखील आहे. परंतु या क्षेत्रातील रोजगार सर्वांपर्यंत न पोचण्याचे मुख्य करण म्हणजेचं जिप्सी धारकांच्या कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक जिप्सी असून देखील त्यांनाच आणखी रोजगाराची प्रशासनाकडून संधी दिली जाते.

याचबरोबर शासकीय तथा खाजगी रोजगार असताना देखील ताडोबा मध्ये जिप्सीची परवानगी मिळण्याकरिता ज्या लोकांनी शासनाला खोटी माहिती देऊन तथा बनावटी कागदपत्रे/ ओळखपत्रे देऊन शासनाची करत गेल्या अनेक वर्षापासून जे लोक या क्षेत्रात वास्तव्यास नाहीत, ज्यांची शहरांमध्ये घरे असून तथा वर्षांवरचे शहरामध्ये वास्तव्यास असून देखील गावातील रहिवासी म्हणणारे असे लोक ज्यांचे संपूर्ण शिक्षण हे गावाबाहेर असलेल्या त्यांच्या राहत्या घरातून झाले अशा लोकांनी शासनाला खोटी माहिती देऊन, गावाचा रहिवासी असल्याचे सांगून रोजगार प्राप्त करून गावातील बेरोजगार तरुणांच्या पोटावर लाथ मारणाऱ्यांची सखोल चौकशी करण करिता युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी आज दिनांक:- ०२ जानेवारीला वन विभागाला तथा वनमंत्रांना मागणी केलेली आहे.

याचबरोबर शासनाची दिशाभूल करणाऱ्या जिप्सी धारकांच्या रोजगाराची, त्यांच्या संपत्तीची, मतदान कार्ड, रहिवासी दाखला या सर्वांची शासनाकडे उपलब्ध असलेल्या तंत्राचा आधार घेऊन सखोल चौकशी करून त्रुटी आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांची परवानगी रद्द करण्याची देखील मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 सुरज ठाकरे यांनी निवेदनाद्वारे प्राप्त तक्रारीवरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे करत गावातील काही विशिष्ट लोक सोडले तर इतर गरजू लोकांनी या गावातील हॉटेल आणि रिसॉर्ट मध्ये फक्त भांडी धुण्याची कामे व वेटर ची कामे, ड्रायव्हर ची कामे करायची काय? किव्हा जंगलामध्ये जाऊन पोट भरण्याकरिता नाईलाजास्तव टोपली-ताटवे बनवण्याकरिता बांबू आणण्याकरिता तथा तेंदु पत्त्याची पाने, मोह वेचण्याकरिता, झाळणी च्या काळ्या वेचण्याकरिता जाऊन वाघाच्या हल्लात बेरोजगारांनी स्वतःचे प्राण गमवायचे काय? म्हणूनच अशा प्रकारची जीवित हानी भविष्यात परत होऊ नये व गावातीलच सुशिक्षित तरुण रोजगारापासून वंचित राहू नये या अनुषंगाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये रोजगार असताना देखील वन्य विभागाकडून अधिकचा रोजगार प्राप्त केलेल्या लोकांच्या ओपन जिप्सी तात्काळ काढून इतर गरजू बेरोजगारांना या ठिकाणी संधी देऊन "१ कुटुंब १ रोजगार, ही योजना राबवण्यास प्रशासनाला जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने