Top News

भाजपाचं झुंजार नेतृत्व हरपलं; आमदार लक्ष्मण जगताप यांच निधन #chandrapur #Mumbai #LaxmanJagtap


मुंबई:- पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर भाजपचे (BJP) माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मध्यंतरी अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली.

गेल्या महिन्यातच भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजाराने निधन झालं होतं. त्यातच आज लक्ष्मण जगताप यांनी देखील आखेरचा श्वास घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने