कवठाडा ते गडचांदूर मार्गावर बस सेवाच नाही #chandrapur #Korpana #Gadchandur(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर-भोयेगाव-धानोरा-चंद्रपूर हा आंतरराज्य महामार्ग आता सिमेंट काँक्रीटचा झाला आहे, मात्र या रस्त्यावरून अजूनही गडचांदूर कवठाळा-भोयेगाव पर्यंत बस सेवा सुरू झालेली नाही त्यामुळे भोयेगाव वरून गडचांदूर ला जाणाऱ्या मार्गावरील विद्यार्थ्यांना अजूनही खाजगी वाहनानेच प्रवेश करावा लागत आहे.

यापूर्वीही रस्त्याच्या अति दुर्दशमुळे विद्यार्थ्यांना बऱ्याचदा खाजगी वाहनाचा आधार घेऊन शाळेत जावे लागत होते. काम पूर्ण झाल्यानंतर बस सेवा उपलब्ध होईल अशी विद्यार्थ्यांना आशा होती, परंतु अजूनही सदर मार्गावरती बस सेवा सुरू झालेले नाही. या मार्गावर केवळ चंद्रपूर डेपोची एक बस कवठाळ्यापर्यंत येते गडचांदूर जाण्याकरिता एक तर दुचाकी अथवा इतर चार चाकी वाहनाचा आधार घेऊनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे जवळपास 66 कोटी रू. खर्च करून बऱ्याच वर्षानंतर सिमेंट काँक्रीट रस्ता भोयेगावं गाव पर्यंत जोडण्यात आला.

या मार्गावरून जाणारे प्रवासी तसेच इतर प्रवाशांना बाहेरगावी जाण्यासाठी एसटीची कुठली सुविधा अद्यापही पुरवण्यात आलेली नाही. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत असलेला दिसतो. भोयेगाव, नांदगाव, कवठाळा, खैरगाव, बाखरडी, तळोदी, लखमापूर, आधी गावातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी गडचांदूर येथे दररोज प्रवास करतात शाळा सुटल्यानंतर त्यांना खाजगी वाहनाची वाट पाहत राहावे लागत आहे. यात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून सोबतच शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे शाळेने दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थी पोहोचतच नसल्याची ओरड आता पालकही करू लागले आहे तेव्हा सदर विभागाने याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत